Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा महागडी कार खरेदी करून रॅप सिंगर बनला 'बादशाह', म्हणाला, 'अपना टाईम आ गया'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 14:48 IST

अमिताभ बच्चन व संजय दत्तने देखील ही कार विकत घेतली आहे. पण, त्या दोघांच्या कारच्या किमतीपेक्षा बादशाहच्या कारची किंमत जास्त आहे.

प्रसिद्ध रॅपर सिंगर बादशाहचे अखेर स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याने रोल्स रॉयसची रेथ ही कार विकत घेतली आहे. या कारची किंमत ६.४६ कोटी असून या कारचे फोटो बादशाहने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत बादशाहसोबत त्याचे कुटुंब पहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे अमिताभ बच्चन व संजय दत्तने देखील ही कार विकत घेतली आहे. पण, त्या दोघांच्या कारच्या किमतीपेक्षा बादशाहच्या कारची किंमत जास्त आहे.

बादशाहने रोल्स रॉयस रेथ कारचा फोटो शेअर करीत लिहिले की, हा खूप मोठा प्रवास होता. कुटुंबात तुझे स्वागत आहे. ही लक्झरी कार विकत घेतल्यानंतर बादशाह गली बॉय स्टाईलमध्ये म्हणाला की, अपना टाईम आ गया. बादशाहच्या कारचा फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला असून सिनेइंडस्ट्रीतील सेलेब्सपासून त्याचे चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

३३ वर्षीय रॅपर बादशाहच्या कुटुंबात त्याच्या आई वडिलांव्यतिरिक्त त्याची बहिण व पत्नी आहे. २१०७ साली त्याच्या घरी एका मुलीचा जन्म झाला आणि २०१७ नंतरच बादशाहचे जवळपास सर्व गाणी सुपरहिट ठरली. बादशाहने नुकतेच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ज्याप्रमाणे एके काळी हनी सिंगची गाणी चित्रपटात टाकणे अनिवार्य मानले जायचे. तसे आता बादशाहच्या गाण्यांशिवाय चित्रपट बनत नाहीत.

बादशाहच्या या गाडीची भारतात किंमत १० कोटी आहे. रेथ नामक हे मॉडेल रॉल्स रॉयसची सर्वात ताकदवान गाडीत गणली जाते. ४ सेकंदात ही गाडी शंभर किलोमीटरची स्पीड पकडू शकते.

रॉल्स रॉयस आपल्या ग्राहकांना गाडीच्या आत हवे तसे बदल करून देते आणि गाडीतील इंटेरियर दुसऱ्या गाडीपेक्षा वेगळी असते.

टॅग्स :बादशहा