Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा हेगडेकडे चाहत्याने मागितला न्यूड फोटो; तिने असे दिले उत्तर की, तो शरमेने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 12:04 IST

अजब मागणीला गजब उत्तर...

ठळक मुद्देपूजाने तमीळ चित्रपट  ‘मुगमूदी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 2012 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात पूजाने शक्तीची भूमिका साकारली होती.  

मिस युनिव्हर्स इंडिया ते बॉलिवूड पर्यंत अभिनेत्री पूजा हेडगे  सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. आता सोशल मीडिया म्हटले की, ट्रोल होण, चाहत्यांच्या विचित्र कमेंट्स आणि तेवढ्याच अजब मागण्या आल्याच. अलीकडे एका चाहत्याने पूजाकडे अशीच अजब मागणी केली. या चाहत्याने काय करावे तर चक्क पूजाकडे न्यूड फोटोची मागणी केली. त्याच्या या मागणीने सगळेच हैराण झालेत. पण पूजा मात्र चतूर निघाली. न्यूड फोटोची मागणी करणा-या या चाहत्याला पूजाने असे काही उत्तर दिले की, तो शरमेने ‘Naked-Naked’ झाला.

तर त्याचे झाले असे की, पूजाने फॅन्सला ट्रिट देण्यासाठी ‘post a photo of  ’ ट्रेंडमध्ये भाग घेतला. स्वत:चे अनेक अनसीन फोटो यादरम्यान तिने चाहत्यांसोबत शेअर केले. अशात एका चाहत्याने पूजाकडे न्यूड फोटोची मागणी केली.

पूजाने यावर काय करावे तर या चाहत्याला आपल्या उघड्या पायाचा फोटो पाठवला आणि या फोटोला ‘नंगे पाव’ असे कॅप्शन दिले. पूजाच्या या उत्तराने न्यूड फोटोची मागणी करणा-या त्या चाहत्याची बोलती बंद झाली नसेल तर नवल. पूजा ही साऊथमधील  एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पूजा हेगडेने आशुतोष गोवारिकरच्या ‘मोहजोंदारो’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.  

पूजाने तमीळ चित्रपट  ‘मुगमूदी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 2012 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात पूजाने शक्तीची भूमिका साकारली होती.  पूजाला सोशल मीडियावर प्रचंड फॅनफॉलोईंग आहे. पूजाने अक्षय कुमारसोबत ‘हाऊसफुल 4’मध्ये काम केले आहे. लवकरच ती प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार आहे. पूजा आणि प्रभासच्या जोडीचा ‘राधेश्याम’ हा त्रैभाषिक चित्रपट असून गुलशन कुमार आणि टी-सीरिज प्रस्तुत, याचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार करणार आहेत.   याशिवाय सर्कस, आचार्य  हे चित्रपट तिच्याकडे आहेत.

टॅग्स :पूजा हेगडे