Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून यामी ठरली‘काबील’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 21:25 IST

‘बदलापूर’ आणि ‘सनम रे’ यातील यामी गौतमच्या कामाचे बरेच कौतुक झाले. पाठोपाठ यामीकडे ‘काबिल’ चालून आला.  यामी एक गुणी ...

‘बदलापूर’ आणि ‘सनम रे’ यातील यामी गौतमच्या कामाचे बरेच कौतुक झाले. पाठोपाठ यामीकडे ‘काबिल’ चालून आला.  यामी एक गुणी अभिनेत्री आहे. सौंदर्य व संपन्न अभिनय सगळेच तिच्याकडे आहे. याचमुळे यामी अनेक निर्माते-दिग्दर्शकांची पसंत ठरत आहे. पण ‘काबिल’बद्दल म्हणाल तर यामीला हा चित्रपट मिळाला यामागे आणखी एक कारण आहे. होय, दिग्दर्शक संजय गुप्ता यांना या चित्रपटासाठी उत्तम अभिनय करणारी अभिनेत्री हवी होतीच. पण याही पेक्षा आणखी एक गोष्ट त्यांना या अभिनेत्रीत हवी होती. ती म्हणजे सुंदर व बोलके डोळे. होय..‘काबिल’मध्ये एका आंधळ्या मुलीची कथा आहे. या मुलीची भूमिका साकारण्यासाठी सुंदर डोळ्यांचीच अभिनेत्री गुप्ता यांना हवी होती. यामीचे बोलके व नितांत सुंदर डोळे पाहून गुप्ता यांनी तिला या चित्रपटासाठी निवडले आणि अशी यामी ‘काबील’ ठरली...