Join us

म्हणून सुशांत सिंग राजपूतने नाकारली 15 कोटींची अॅड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 15:23 IST

एम. एस.धोनी द अनदोल्ड स्टोरी चित्रपटातून महेंद्र सिंह धोनीची भूमिका पडद्यावर साकारलेल्या सुशांत सिंग राजपूतने तब्बल 15 कोटींच्या अॅडची ...

एम. एस.धोनी द अनदोल्ड स्टोरी चित्रपटातून महेंद्र सिंह धोनीची भूमिका पडद्यावर साकारलेल्या सुशांत सिंग राजपूतने तब्बल 15 कोटींच्या अॅडची ऑफर नाकारली आहे. त्याला एक फेअरनेस क्रिमच्या अॅडसाठी विचारण्यात आले होते. मात्र सुशांत ने या अॅडसाठी  नाही सांगितले आहे. सुशांतने सांगितले अशा गोष्टीना प्रमोट केल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो आणि ही एका कलाकाराची जबाबदारी आहे की त्यांनी समाजात चुकीचा संदेश देऊ नये.   गेल्या वर्षी अभिनेता अभय देओलने सुद्धा फेअरनेस क्रिमच्या अॅडवर खूप टीका केली होती. ज्यानंतर बॉलिवूडमध्ये अशा प्रकारच्या अॅड करणे योग आहे की नाही यावर चांगलाच वाद निर्माण झाला होता. अभिनेता असो किंवा अभिनेत्री  यांची स्टाईल फॉलो करणारे बरेच जण असतात. त्यामुळे याआधी ही फेअरनेस क्रिमची अनेक जणांनी नाकारली होती.ALSO READ :  सुशांत सिंग राजपूतने घेतला ‘केदारनाथ’च्या निर्मात्यांशी पंगा! मिळणार चांगलाच ‘धडा’!!सुशांतच्या कामाबाबत बोलायचे झाले तर तो त्याला सध्या एका हिट चित्रपटाची गरज आहे. राब्ता चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर सुशांत एक हिट चित्रपटाच्या शोधात आहे. सध्या तो केदारनाथच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या त्याच्यासोबत   सारा अली खान दिसणार आहे. हा चित्रपट २०१३ मध्ये ‘केदारनाथ’मध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेट डोरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न प्रकारची आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर असतील यात काही शंका नाही. सारा एका श्रीमांत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो.  'केदारनाथ’ हा चित्रपट एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे.  यानंतर तो  ‘डिटेक्टिव ब्योमकेस बक्शी’ या चित्रपटात दिसणार आहे.