म्हणून रणवीर सिंग चित्रपट साईन करण्यापूर्वी घेणार अक्षय कुमारची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 11:03 IST
रणवीर सिंग अक्षय कुमारचा हिट चित्रपट सिंग इज किंगच्या सीक्वलमध्ये काम करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे तुम्हाला माहितीच आहे. या ...
म्हणून रणवीर सिंग चित्रपट साईन करण्यापूर्वी घेणार अक्षय कुमारची परवानगी
रणवीर सिंग अक्षय कुमारचा हिट चित्रपट सिंग इज किंगच्या सीक्वलमध्ये काम करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे तुम्हाला माहितीच आहे. या गोष्टीचा खुलासा काही दिवसांपूर्वीच सिंग इज किंगचा निर्माता शैलेंद्र सिंगने केला होता कि सिंग इज किंगच्या रिमेक रणवीर सिंगला घेऊन तयार करण्यात येईल. यासाठी निर्मात्यांना रणवीर सिंगची भेट देखील घेतली. मात्र रणवीर सिंगने सिंग इज किंग चित्रपट साईन करण्यापूर्वी असे काही केले जे ऐकून तुम्ही त्याचे चाहते बनाल. सूत्रांच्या माहितीनुसार रणवीर सिंगने या चित्रपटाचा सीक्वल साईन करण्यापूर्वी अक्षय कुमारची परवानगी मागितली. मिळालेल्या माहितीनुसार रणवीर सिंगला शेर सिंगची भूमिका आवडली आहे. मात्र हा चित्रपट साईन करण्यापूर्वी त्याला अक्षय कुमारची परवानगी पाहिजे आहे. कारण रणवीर सिंगचे अक्षय कुमारसोबत चांगले रिलेशन्स आहेत. रणवीरला एक चित्रपटाला घेऊन हे संबंध बिघडवायचे नाही आहेत. ALSO RAED : रस्त्यांवर भीक मागणा-या आपल्या एका चाहतीला रणवीर सिंगने असे केले खूश! पाहा व्हिडिओ!!रणवीरच्या आधी अर्जुन कपूरने सुद्धा असे केले आहे. नमस्ते लंडनचा सीक्वल नमस्ते कॅनडा साईन करण्यापूर्वी अर्जुनने अक्षयकडे यासाठी परवानगी मागितली होती. यासाठी अक्षयने हसत-हसत अर्जुनला परवानगी दिली सुद्धा होती. आम्हाला पूर्ण आशा आहे की अक्षय कुमार रणवीरला सुद्धा शेर सिंग साकारण्यासाठी होकार देईल. रणवीरचा पद्मावती चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘पद्मावती’त रणवीर अलाऊद्दीन खिल्जीच्या निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे.. रणवीरच्या भूमिकेला निगेटीव्ह शेड्स आहे. दीपिका पादुकोण यात राणी पद्मावतीच्या भूमिका साकारतो आहे तर शाहिद कपूर राजा महारावल रतन सिंहच्या भूमिकेत दिसणार आहे. यानंतर रणवीर १९८३च्या विश्वकप विजेत्या भारतीय संघावर आधारित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करतो आहे. रणवीर सिंग यात त्यावेळीचे भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे. तर रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत कॅटरिना कैफ दिसणार आहे. पहिल्यांदाच रणीवर कॅटरिनासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तसेच रणवीर रोहित शेट्टीच्या चित्रपटातही दिसणार आहे.