...म्हणून बॉलिवूडमधल्या अभिनेत्याशी लग्न करणार नाही परिणीती चोप्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 12:09 IST
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा फोटो फेमस मॅगझिनच्या कव्हर पेझवर दिसणार आहे. तिने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला ...
...म्हणून बॉलिवूडमधल्या अभिनेत्याशी लग्न करणार नाही परिणीती चोप्रा
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा फोटो फेमस मॅगझिनच्या कव्हर पेझवर दिसणार आहे. तिने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा टॉप परिधान केला आहे. ग्रेजिया मॅगझिनच्या कव्हर फोटोवर ती फेब्रुवारीमध्ये झळकणार आहे. या मॅगझिनला दिलेल्या इंटरव्ह्रु दरम्यान परिणीती वैयक्तिक आयुष्यासंबंधी बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. यावेळी परिणीती म्हणाली मी कोणत्याही अभिनेत्याला डेट करण्याबाबत किंवा त्याच्यासोबत लग्नाचा विचार करुच शकत नाही. काही महिन्यांपूर्वी परिणीतीचे नाव हार्दिक पंड्यासोबत जोडण्यात आले होते. दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. मात्र या सगळ्या गोष्टी केवळ अफवा तिने सांगितले, परिणीती म्हणाली की, मी कोणा अभिनेत्यासोबत डेटवर जायचा किंवा लग्नाचा विचार करु शकत नाही. कारण या इंडस्ट्री मैत्री निभावणेच कठिण आहे तर रिलेशनशीप टिकवणं तर एक आव्हानच आहे. ALSO READ : परिणिती चोप्रा का गुणगुणतेय ऑस्ट्रेलियाचे सूर?लवकरच परिणीती‘संदीप और पिंकी फरार’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट भारत विरूद्ध इंडियाच्या कल्पनेवर आधारित असल्याचे त्याने सांगितले होते. गेल्या काही काळात आपला देश भारत विरूद्ध इंडिया अशा वेगळ्यात गुंत्यात फसलेला दिसतोय. दोन वेगवेगळ्या विचारधारांचा संघर्ष देशात पाहायला मिळतो आहे. ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट याच विचारधारेवर बेतलेला असेल. समाजातील बदल लोकांच्या आयुष्यात कशी उलथापालथ घडवू शकतात, हे या चित्रपटात दिसेल, असे त्याने सांगितले होते. दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथेबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय. या चित्रपटातीची गोष्ट एका कॉरपोरेटमध्ये काम करणाऱ्या मुलीची आहे. जो आपल्या ध्येयाला घेऊन खूप फोक्स्ड असते. अर्जुन कपूर पोलिस कर्मचाºयाच्या भूमिकेत दिसणार आहे. 6 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परिणीती आणि अर्जुनने इश्कजादे चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तब्बल 4 वर्षांनंतर दोघांची केमिस्ट्री पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील यात काही शंका नाही