म्हणून नन बनली सोफिया!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 16:21 IST
कधी काळी न्यूड फोटो शूटने चर्चेत आलेली ‘बिग बॉस ७’ची स्पर्धक सोफिया हयात आता मदर सोफिया झाली आहे. सोफियाने ...
म्हणून नन बनली सोफिया!!
कधी काळी न्यूड फोटो शूटने चर्चेत आलेली ‘बिग बॉस ७’ची स्पर्धक सोफिया हयात आता मदर सोफिया झाली आहे. सोफियाने टिष्ट्वटरवरून याची घोषणा केली होती. पण सोफिया एका रात्रीत नन बनली नाही. तिच्या या निर्णयामागे अनेक कारणे आहे. सोफिया सध्या यूकेमध्ये आहे. नन होण्याचा निर्णय का घ्यावा लागला, याबद्दल सोफियाने अनेक खुलासे केले आहेत. रिलेशनशिपमध्ये सहन केलेला विश्वासघात, अत्याचार आणि दहशत यामुळे सोफिया अखेर या निर्णयाप्रत येऊन पोहोचली. तिने सांगितल्यानुसार, आयुष्यातील असुरक्षितता आणि भीती यामुळे तिच्यात अंतर्गत बदल होत गेले. दोन वर्षांपूर्वीच याची सुरुवात झाली. ती सांगते, मी ज्या रिलेशनशिपमध्ये होते, त्यामुळे कमालीची दु:खी झाली होते. एकदा मी स्वत:ला संपवण्याचाही प्रयत्न केला. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा जणू माझा नवा जन्म झाल्याचे मला जाणवले. हे नवे आयुष्य परमेश्वराने मला दिलेय, असे मला वाटले. माझे नवे आयुष्य मी परमेश्वराची भेट म्हणून स्वीकारले आणि नन बनण्याचा माझा प्रवास सुरु झाला.. कोण आहे, सोफियाब्रिटनमध्ये राहणारी सोफिया पेशाने मॉडेल होती. बॉलिवूड पार्टी आणि रेड कार्पेटवर तिच्या बोल्ड लूकने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलाय. सोशल मीडियावरही अनेक बोल्ड व टॉपलेस फोटो तिने शेअर केले आहेत. बिग बॉसच्या सातच्या सीझनमध्ये ती होती. यावेळी अरमान कोहलीवर तिने गैरवर्तनाचा आरोप केला होता. यापंतर बिग बॉसच्या घरातच त्याला अटक करण्यात आली होती व नंतर सुटका.