...म्हणून इरफान खान शूटिंग अर्धवट सोडून घरी गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 10:45 IST
इरफान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंमध्ये व्यस्त आहे. मात्र शूटिंग सुरू असताना त्याच्यावर अचानक ती सोडून घरी जाण्याची ...
...म्हणून इरफान खान शूटिंग अर्धवट सोडून घरी गेला
इरफान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंमध्ये व्यस्त आहे. मात्र शूटिंग सुरू असताना त्याच्यावर अचानक ती सोडून घरी जाण्याची वेळ आली आहे. इरफानच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. इरफानला कावीळ झाली आहे म्हणून त्याच्यावर शूटिंग अर्धवट सोडून घरी जाण्याची वेळ आली. डॉक्टरने त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्याला आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनला देखील जाता येत नाही आहे. इऱफानला कावीळ झाल्यामुळे डॉक्टरांने त्याला बाहेरचा न खाण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्याला काहीकाळ आराम करण्याचा सल्ला दिला आहे. इरफानची टीम त्याचे कार्यक्रम पुन्हा एकदा रिशेड्यूल करण्याचे काम करते आहे. कारण त्यामुळे इतरांची गैरसोय होऊ नये. इरफानला एका राजनैतिक व्यंग्यावर आधारित सिरीज द मिनिस्ट्रीच्या शूटिंगसाठी पंजाबला जायचे होते त्यानंतर त्याला आपला आगामी चित्रपट 'ब्लॅकमेल'च्या प्रमोशनला लागायचे होते. मात्र त्याला आता आराम करावा लागणार आहे.‘ब्लॅकमेल’ चित्रपट मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनय देव करणार आहे. टी-सीरिज आणि आरडीपी मोशन पिक्चर्स हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहे. नावावरून हा चित्रपट गंभीर वाटत असला तरी प्रेक्षकांना यात कॉमेडीचा जबदस्त तडका पाहायला मिळणार आहे. इरफान अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ सिरिजच्या 'द मिनस्ट्री'मध्ये दिसणार आहे. यानंतर तो विशाल भारव्दाजच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. विशाल भारव्दाजचा हा चित्रपट एक सत्य घटनेवर आधारित आहे. रहिमा खान नावाची लेडी डॉन सपना दीदीच्या नावाने फेमस होती. रहीमाने आपल्या नवऱ्याच्या खूनचा बदला घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मारण्याचा प्लॉन आखला होता. मात्र यात तिचाच मृत्यू झाला. चित्रपटात रहिमाची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार आहे. तर इरफान खान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची भूमिका साकारणार आहे. विशाल भारव्दाज यांचा हा बिग बजेट चित्रपट असणार आहे. २०१८ च्या अखेरीस हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.