Join us

ऐश्वर्याची ‘डुप्लिकेट’ स्रेहा उल्लालला कुणी ओळखेना! आता दिसते अशी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 21:57 IST

ऐश्वर्या रॉयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमान खानने एका नव्या अभिनेत्रीला लॉन्च केले होते. जी हुबेहुब ऐश्वर्यासारखी दिसत होती.  आम्ही बोलतोय ते सलमानच्या ‘लकी- नो टाईम फॉर लव’ या चित्रपटाची हिरोईन स्रेहा उल्लालबद्दल.

ऐश्वर्या रॉयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमान खानने एका नव्या अभिनेत्रीला लॉन्च केले होते. जी हुबेहुब ऐश्वर्यासारखी दिसत होती. प्रेक्षकांनी ऐश्वर्यासारख्या या हिरोईनला पाहिले आणि पाहतचं राहिलेत. आम्ही बोलतोय ते सलमानच्या ‘लकी- नो टाईम फॉर लव’ या चित्रपटाची हिरोईन स्रेहा उल्लालबद्दल. गेल्या अनेक वर्षांपासून स्नेहा लाईमलाईटपासून दूर आहे. पण सध्या तिचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो आहे. होय, इन्स्टा हँडल विरल भियानीने स्रेहाचा एक ताजा व्हिडिओ शेअर केला आहे. यात स्नेहा ग्रीन टॉप आणि ब्ल्यू पँटमध्ये दिसतेय.

 स्रेहा एका कापडाच्या दुकानातून बाहेर पडतेय आणि तिच्यासमोर तिची आई आहे. खरे तर बॉलिवूड नट्या शॉपिंगसाठी बाहेर पडताचं, लोकांची गर्दी जमा होते़. पण या व्हिडिओत दिसतेय त्याप्रमाणे स्रेहा अगदी आरामात शॉपिंग करतेय. कारण आजूबाजूच्या लोकांनी तिला ओळखलेचं नाही. सिंपल लूकमधील स्रेहा अगदी सामान्य मुलीसारखी बाजारात फिरतेय. दोन-तीन तासांपूर्वी पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत ५० हजारांवर लोकांनी पाहिले आहे.गतवर्षी जूनमध्ये स्रेहाने एक मुलाखत दिली होती. गत चार वर्षांपासून मी एका गंभीर आजाराशी लढत होते, असे स्रेहाने सांगितले होते. या आजारपणातून बाहेर पडल्यानंतर स्रेहा डिसेंबर २०१७ मध्ये ‘इश्कवाली बारीश’ या म्युझिक व्हिडिओत दिसली होती. हा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाल्यानंतरही स्रेहा मीडियाशी बोलली होती. मी कुठे गायब आहे, असे मला चाहते विचारतात. मी कुठेही गेलेली नाही. मी लवकरच चित्रपटांत दिसेल, असे ती म्हणाली होती.