Join us

​ड्रग्ज रॅकेट वादावर ममताने तोडली चुप्पी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 16:58 IST

एकेकाळी शाहरूख खान, सलमान खान यासारख्या सुपरस्टार्ससोबत काम करुन चुकलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या जाम चर्चेत आहे. मुंबई पोलिसांनी ...

एकेकाळी शाहरूख खान, सलमान खान यासारख्या सुपरस्टार्ससोबत काम करुन चुकलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या जाम चर्चेत आहे. मुंबई पोलिसांनी एका ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे आणि विकी गोस्वामी या रॅकेटचा म्होरक्या असल्याचे सांगितले जात आहे.  विकी गोस्वामी म्हणजे ममताचा पती. पोलिसांच्या मते, ममताचा पती कुख्यात ड्रग्ज माफिया आहे आणि इंटरनॅशनल ड्रग्ज रॅकेट चालवतो. या सर्व वादावर ममताने चुप्पी तोडली असून माझा पती निर्दोष असल्याचे तिने म्हटले. एका मुलाखतीत ममताने तिच्या पतीवरचे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला. शिवाय ड्रग्ज डीलिंगप्रकरएी काही महिन्यांपूर्वी केन्यामध्ये तिच्या पतीला अटक झाल्याचे वृत्तही फेटाळून लावले. विक्की सध्या केन्या येथे आहे आणि आपला बिझनेस सांभाळतो आहे. त्याला खोट्या प्रकरणात गोवण्याचे काही लोकांचे प्रयत्न आहे, असे ममताने स्पष्ट केले. ड्रग्ज रॅकेटमध्ये ममता हिचाही सहभाग आहे वा नाही, याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. याबाबत विचारले असता, पोलिस या प्रकरणात माझे नाव का घेत आहेत, ते मला ठाऊक नाही, असे ममताने स्पष्ट केले.