Join us

स्लीपिंग ब्युटी कॅटरिना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 10:01 IST

मग काय? कॅट तर चक्क कारमध्ये बसल्या बसल्याच झोपली. तिचा झोपलेला एक व्हिडीओ सिद्धार्थने काढला असून तो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

 सेलिब्रिटी असले म्हणून काय झाले? त्यांनाही वेळेवर जेवण, आराम, व्यायाम, पुरेशी झोपही आवश्यकच असते. मात्र, शुटींगचे सतत बिझी शेड्यूल असल्यामुळे त्यांना पुरेशी झोपही मिळू शकत नाही. त्यामुळे मग कधीतरी अशी गंमत होते.आता तुम्ही म्हणाल नेमकं झालेय तरी काय? सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ हे सध्या ‘बार बार देखो’ चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. जयपूर, राजस्थान अशा बऱ्याच  राज्यांमध्ये ते प्रमोशनसाठी जात आहेत. त्यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाहीये. मग काय?कॅट तर चक्क कारमध्ये बसल्या बसल्याच झोपली. तिचा झोपलेला एक व्हिडीओ सिद्धार्थने काढला असून तो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आहे की नाही गंमत? चित्रपटात त्यांनी जय आणि दिया यांची लव्हस्टोरी साकारली आहे. नित्या मेहरा दिग्दर्शित या चित्रपटात सयानी गुप्ता, सारिका आणि राम कपूर हे दिसणार आहेत. ९ सप्टेंबरला चित्रपट रिलीज होईल.