सुशांत सिंह राजपूतसोबतच्या रिलेशनशिपवर अखेर बोलली क्रिती सॅनन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2017 15:43 IST
अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सॅनन या दोघांचे रिलेशनशिप कुणापासूनही लपून राहिलेले नाही. गेल्या वर्षभरात या ‘लव्हबर्ड्स’मधील प्रेम चांगलेच ...
सुशांत सिंह राजपूतसोबतच्या रिलेशनशिपवर अखेर बोलली क्रिती सॅनन!
अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सॅनन या दोघांचे रिलेशनशिप कुणापासूनही लपून राहिलेले नाही. गेल्या वर्षभरात या ‘लव्हबर्ड्स’मधील प्रेम चांगलेच बहरले. त्याचमुळे इव्हेंट कुठलाही असो, हे ‘लव्हबर्ड्स’ दिसतातच दिसतात. पण यावरून क्रिती व सुशांत एकमेकांच्या प्रेमात आहेत,असे कसे मानायचे? आमचा हा प्रश्न वाचून आश्चर्य वाटले ना? पण काय करणार, क्रिती व सुशांतची बॉडी लँग्वेज काहीही सांगत असली तरी ते खोटे आहे, असेच समजायचे. होय, कारण क्रितीचे मानाल तर तिच्यात आणि सुशांतमध्ये ‘तसले’ काहीही नाही. म्हणजेच, आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, हे तुणतुणे पुन्हा एकदा क्रितीने वाजवले आहे. केवळ इतकेच नाही तर अॅक्ट्रेसला सर्रास तिच्या को-स्टारसोबत लिंकअप करण्याचा हा नवा ट्रेंड बंद व्हायला हवा, असेही तिने म्हटले आहे. अलीकडे एका मुलाखतीत क्रिती बोलली. को-स्टारसोबत मैत्री होणे, त्याच्यासोबत डिनरला वा मुव्हीला जाणे, यात मला गैर वाटत नाही. लोक तुमच्याबद्दल ना-ना तºहेच्या चर्चा करतात, म्हणून मी माझ्या मित्रांसोबत बाहेर जाणे थांबवू शकत नाही. मी प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तरे देत बसणार नाही. मी माझ्या मित्रांसोबत फिरेल, मज्जा करेल. मग लोकांना काहीही बोलू देते. राहिली गोष्ट सुशांतची तर, लोक त्याच्या व माझ्याबद्दल काय बोलतात, यावर माझा काहीही कंट्रोल नाही. मी याबद्दल बराच खुलासा केला आहे, असे क्रिती म्हणाली.मी रोमॅन्टिक मुलगी आहे. कदाचित सर्वच मुलींसारखी रोमॅन्टिक आहे. एक्सपेन्सिव्ह डेटवर जाण्यापेक्षा पायजामा घालून मस्तपैकी टीव्हीवर एखादा चित्रपट बघावा किंवा बीचवर फिरत सुटावे, हे मला अधिक आवडते. त्यामुळे मी फार हाय मेंटेनन्स गर्लफ्रेन्ड नाही, असे क्रिती म्हणाली. आता क्रिती हे म्हणतेय, म्हटल्यावर विश्वास ठेवायलाच हवा. होय ना?