गेल्या अनेक दिवसांपासून 'सितारे जमीन पर'च्या ट्रेलरची (sitaare zameen par trailer) उत्सुकता होती. अखेर नुकतंच 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'तारे जमीन पर' सिनेमाच्या जादूला १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा अनुभवण्याची वेळ आली आहे! आमिर खान (aamir khan) 'सितारे जमीन पर' माध्यमातून पुन्हा एकदा एक नवीन, हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करण्यास सज्ज झाले आहेत. अल्पावधीत 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर व्हायरल झाला आहे.
'सितारे जमीन पर'चा ट्रेलर
'सितारे जमीन पर'च्या ट्रेलरमध्ये दिसतं की, आमिर खान एक बास्केटबॉल कोच असतो. त्याला ड्रींक अँड ड्राईव्हच्या माध्यमातून कोर्टात शिक्षा होते. आमिर खानला दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवायला सांगितलं जातं. पुढे आमिरची या मुलांशी ओळख होते. दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवून त्यांचा बास्केटबॉल संघ बनवण्याचं महत्वाचं चॅलेंज आमिर घेतो. यामध्ये तो यशस्वी होतो का? त्याला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं? याची कहाणी 'सितारे जमीन पर'च्या ट्रेलरमध्ये दिसते.
कधी रिलीज होणार सिनेमा?
आमिर खान प्रोडक्शन्स या सिनेमाद्वारे १० नवोदित कलाकारांना लॉन्च करत आहे .अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर. 'सितारे जमीन पर'चं दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले आहे. या सिनेमाची निर्मिती ‘आमिर खान प्रोडक्शन्स’च्या बॅनरखाली झाली आहे.
‘सितारे जमीन पर’ मध्ये आमिर खान आणि जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय यांचे असून अमिताभ भट्टाचार्य यांनी गाणी लिहिली आहेत. चित्रपटाचे निर्माते आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भगचंदका हे आहेत. २० जूनला हा सिनेमा रिलीज होणार आहे.