Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिरच्या 'सितारे जमीन पर'चा पहिला रिव्ह्यू समोर, सचिन तेंडुलकर सिनेमा पाहून म्हणाला-

By देवेंद्र जाधव | Updated: June 19, 2025 16:59 IST

आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर' पाहण्याचा विचार करताय? सचिनने दिलेला रिव्ह्यू एकदा वाचा

आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सिनेमा उद्या रिलीज होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. अखेर 'सितारे जमीन पर' थिएटरमध्ये पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.  'सितारे जमीन पर' सिनेमाचं काल रात्री विशेष स्क्रीनिंग झालं. यावेळी आमिर खानचे इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रीण आणि इतर सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हजेरी लावली होती. सचिन तेंडुलकरने  'सितारे जमीन पर' पाहून त्याची खास प्रतिक्रिया दिली आहे. 

सचिन 'सितारे जमीन पर' पाहून काय म्हणाला?

आमिर खानच्या निर्मिती संस्थेच्या युट्यूब चॅनलवर  'सितारे जमीन पर'चा खास व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत  'सितारे जमीन पर' संपल्यावर सचिन तेंडुलकरने त्याची खास प्रतिक्रिया दिली आहे. सचिन म्हणाला की, "मला सिनेमा खूप आवडला. हा असा सिनेमा आहे जो पाहताना आपण सितारे टीमसोबत हसतो आणि आपले डोळे पाणावतात. खेळामध्ये अनेक गोष्टी शिकवण्याची ताकद असते हे मी कायमच म्हणत आलो आहे.  या सिनेमात अनेक चांगले संदेश आहेत. लोकांना एकमेकांशी जोडण्याचं काम हा सिनेमा करतो. सर्व कलाकारांसाठी मोठं थम्स अप! सर्वांनीच खूप चांगलं काम केलं आहे. सर्वांना शुभेच्छा."

अशाप्रकारे सचिन तेंडुलकरने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. सचिनने दिलेल्या खास प्रतिक्रियेमुळे 'सितारे जमीन पर' पाहण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ‘सितारे जमीन पर’ सिनेमा उद्या २० जूनला देशभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा एका स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे. ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात १० नवोदित कलाकार अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा विशेष सहभाग आहे. आमिर - जिनिलीया या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

टॅग्स :आमिर खानबॉलिवूडसचिन तेंडुलकर