Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बहिणीने कॉपी केले बहिणीचे स्टाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 22:03 IST

एकाच आईवडिलांच्या पोेटी जन्माला आलेल्या दोन बहिणी. चेहरा, स्वभाव वेगळा. पण, स्टाईल मात्र डिक्टो सारखीच. यामागे एक प्रेमळ इर्ष्या ...

एकाच आईवडिलांच्या पोेटी जन्माला आलेल्या दोन बहिणी. चेहरा, स्वभाव वेगळा. पण, स्टाईल मात्र डिक्टो सारखीच. यामागे एक प्रेमळ इर्ष्या आहे. आपली थोरली वा धाकटी बहीण दिसते तसेच आपणही दिसायला हवे. याच प्रेमळ इर्ष्येतून मग कॉपी होते स्टाईल आणि भिन्न चेहरा व स्वभावाच्या दोन्ही बहिणीत दिसायला लागते एक विलक्षण साम्यता. काय म्हणता...? उदाहरण हवे...? नूतन-तनूजा, लता-आशा किंवा आताच्या सोनम-रेहा व जान्हवी - खुशी क पूर ही त्याचीच उदाहरणे आहेत की. अशाच बॉलिवूडमधील आणखी काही स्टायलीश बहिणींची ही रंजक माहिती खास सीएनएक्सच्या वाचकांसाठी...........सोनम कपूर - रेहा कपूर अनिल कपूर यांच्या सोनम व रेहा या दोन्ही मुली स्वत:च्या स्टाईलबद्दल चांगल्याच कॉन्शस आहेत. व्यावसायिक अभिनेत्री असलेली सोनम बॉलिवूडमध्ये स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाते. तर रेहा देखील आता निर्मिती व दिग्दर्शनात पाऊल ठेवते आहे. मात्र कदाचित हे फारच कमी लोकांना माहिती असेल की सोनमच्या स्टाईलमागे रेहाचा मोठा हात आहे. सोनमसाठीचे कपडे डिझाईन करण्याचे काम रेहा मागील कित्येक वर्षांपासून करीत आहे. सोनम व रेहा यांची स्टाईल पाहिल्यावर त्यांच्यातील साम्य मेंटेन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. दोघीही बहिणी स्टायलिश आणि एक्स्पेरीमेंटल आहेत. करिश्मा कपूर - करिना कपूर बालिवूडमध्ये प्रेग्नेंसी ट्रेन्डचे श्रेय मिळविणारी अभिनेत्री करिना कपूर व तिची बहीण करिश्मा कपूर यांची स्टाईल व फॅशन जबरदस्त असते. दोन्ही बहिणी जेवढ्या ग्लॅमरस आहेत तेवढेच त्याचे स्टाईल स्टेटमेंटही क्लासी असते हे सर्वांनाच ठाऊक आहे. इंडियन वेअर असो किंवा वेस्टर्न फॅशन असो दोघीचे सौंदर्य यात खुलून दिसते. विशेष डिझायनर मनीष मल्होत्राकडून करिष्मा व करिना या दोन्ही बहिणी आपल्या स्टाईलसाठी सल्ला घेतात. याचमुळे दोघींची स्टाईल हटके असली तरी एकमेकींना पुरक असल्याचे दिसते. मलायका अरोरा - अमृता अरोरा बॉलिवुडमधील सर्वांत चर्चीत फॅशन आयकॉनपैकी एक असलेली मलायका अरोरा हिची स्टाईल फलो करण्यासाठी सर्वांत आधी पुढाकार घेण्यात तिची बहिण अमृता अरोरा आघाडीवर आहे. कपूर सिस्टर्स यांच्या बेस्ट फ्रे ंड असलेल्या अरोरा सिस्टर्स डिझायनर मनीषा मल्होत्राच्या फालोअर्स आहेत. मलायका व अमृता यांच्यात चांगलीच गट्टी आहे म्हणूनच तर दोन्ही बहिणी अनेकदा रॅम्पवर एकाच सारख्या कॉश्च्यूमध्ये  एकत्र दिसल्या आहेत. शिल्पा शेट्टी - शमिता शेट्टी स्टाईलआपल्या खास स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळख मिळविणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. चंदेरी दुनियेत शिल्पाची स्टाईल सर्वाधिक फॉलो केली जाते असे म्हणतात. अनेक टीव्ही कलाकारांनी तर शिल्पाच्या स्टाईलची आॅनस्क्रिन कॉपी केली आहे. अशा वेळी शिल्पाची लहान बहिण शमिता देखील तिच्या स्टाईलचा कित्ता गितविताना दिसते. दोघींना एकत्र पाहिल्यावर त्यांच्या स्टाईल व फॅशनमधील साम्य चटकण लक्षात येते. अर्थातच शिल्पाचा डिझायनरलाच शमिता फॉलो करते हे विशेष. प्रियांका चोप्रा - परिणीती चोप्रा बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा व अभिनेत्री परिणीती चोप्रा या सख्या बहिणी नसल्या तरी देखील दोघांमधील नाते याहून कमी नाही. प्रियांका आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. बॉलिवूडमधील आघाडीच्या स्टायलीश दिवामध्ये तिचा समावेश होतो. तिच्याच पावलावर पाऊल ठेवत परिणीती चोप्रा देखील स्वत:चे स्टाईल स्टेटमेंट तयार करू पाहतेय. परिणीतीला आपल्या मोठ्या बहिणीचे मोलाचे मार्गदर्शन मिळतेय. दोघींची स्टाईल पाहिल्यावर हे लक्षात येतेच. जान्हवी कपूर-खुशी कपूर श्रीदेवीच्या मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांनी अद्याप बॉलिवूडमध्ये डेब्यू केला नसला तरी दोघींच्या स्टाईलची चांगलीच चर्चा आहे. श्रीदेवी आपल्या खास स्टाईलसाठी ओळखली जाते. श्रीदेवीच्या दोन्ही मुली आपल्या स्टाईलबद्दल चांगल्याच अवेअर आहेत असेच म्हणायला हवे. नुकतेच श्रीदेवी सोबत जान्हवी व खुशी यांची स्टाईल पाहिल्यावर मुली देखील आईच्या वळणावर पोहचल्या आहेत असेच तुम्ही म्हणाल. आपल्या मुुलींचा ड्रेसिंग सेन्स क ॉन्ट्रास्ट ठेवण्यावर श्रीदेवीचा भर असतो. म्हणूच दोघीही आपल्या आईसोबत असल्या तरी वेगवेगळी स्टाईल स्टेटमेंट फॉलो करीत असल्याचे जाणविते.