Join us

ईशान खट्टरला सोडून मिस्ट्री बॉयसोबत बघावयास मिळाली श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 20:36 IST

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सध्या भलतीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती डिनर डेटवर जाताना स्पॉट झाली होती. खरं तर ...

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सध्या भलतीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती डिनर डेटवर जाताना स्पॉट झाली होती. खरं तर गेल्या काही दिवसांपासून ती शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर याच्यासोबतच रेस्टॉरंट किंवा इतर ठिकाणी बघावयास मिळत असे. परंतु यावेळेस ती एका मिस्ट्री बॉयसोबत स्पॉट झाली. यावेळी जान्हवीने मरून आणि ब्लू रंगाचा शायनिंगवाला लोअर परिधान केला होता. यावेळी तिने ब्लॅक कलरचा स्टॉप कॅरी केला होता. लाइटमेकअपमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. सध्या जान्हवी तिच्या डेब्यू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शशांक खेतान दिग्दर्शित ‘धडक’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्यासोबत शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर मुख्य भूमिकेत आहे. आजच या दोघांच्या डेब्यू चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले असून, त्यामध्ये दोघांची रोमॅण्टिक केमिस्ट्री दिसून येत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनअंतर्गत निर्मित हा चित्रपट आतापासूनच चर्चेत असून, प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. जान्हवीचा ‘धडक’ सुपरहिट मराठी ‘सैराट’चा हिंदी रिमेक आहे. दरम्यान, जान्हवी ज्या मिस्ट्री बॉयसोबत बघावयास मिळाली त्याच्याबद्दल अद्यापपर्यंत कुठलीही माहिती समोर आली नाही. जान्हवीची ‘मॉम’ श्रीदेवी तिच्याबद्दल खूपच संवेदनशील आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या दोन्ही मुलींना मित्रांसोबत सेल्फी काढण्यास सक्त मनाई केली.