Join us
Daily Top 2Weekly Top 5

 सिंगर नीति मोहन व अभिनेता निहार पांड्याच्या घरी ‘सन-राईज’, शेअर केली गोड बातमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 11:26 IST

Neeti Mohan : गायिका नीती मोहन झाली आई; गोड बातमीनंतर शुभेच्छांचा वर्षाव

ठळक मुद्देयावर्षी फेब्रुवारी महिन्यात नीति  व निहारच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली. वेडिंग अ‍ॅनिवर्सरीच्या दिवशी नीतिने निहारसोबत एक फोटो शेअर आई होणार असल्याची गुड न्यूज दिली होती.

बॉलिवूड सिंगर नीति मोहन (Neeti Mohan) आई झालीये. नीतिचा पती व अभिनेता निहार पांड्या (Nihar Pandya)  याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. नीतिने  बुधवारी मुलाला जन्म दिला. नीति व बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. (Neeti Mohan blessed with baby boy) निहारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नीतिसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत बाबा झाल्याची बातमी दिली आहे. ‘आज या पावसाळी आणि ढगाळ दिवशी आमच्या घरी ‘सन-राइज’ झाला आहे. माझ्या सुंदर पत्नीने मला माझ्या वडिलांनी जे शिकवले ते आमच्या मुलाला शिकवण्याची संधी दिली. ती रोज माझ्या आयुष्यात नवा आनंद घेऊन येते.  नीति आणि आमचे बाळ एकदम स्वस्थ आहेत,’ असे निहारने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले. 

त्याच्या या पोस्टनंतर नीति  व निहारवर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. नीतिची बहीण शक्ती मोहनने सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्यात. ‘खूप आनंद झालाये.  मी मावशी झाले. आता आम्ही तुमच्या छोट्या बेबीला बिघडवण्यासाठी आम्ही तयार आहोत, पार्टीसाठी तयार आहोत,’ अशी पोस्ट तिने केली. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात नीति  व निहारच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली. वेडिंग अ‍ॅनिवर्सरीच्या दिवशी नीतिने निहारसोबत एक फोटो शेअर आई होणार असल्याची गुड न्यूज दिली होती.

नीति मोहन आणि निहार पंड्या यांनी 15 फेब्रुवारी 2019 रोजी लग्नगाठ बांधली होती. दोघांचं लव्हमॅरेज आहे. या शाही लग्नाची चर्चा हैदराबादमध्ये खूूप झाली होती. लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  निहारने ‘मणिकर्णिका’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता.  नीतिबद्दल सांगायचे तर ती बॉलिवूडची एक आघाडीची गायिका आहे. जब तक है जान, सोनू के टीटू की स्वीटी अशा सुपरहिट चित्रपटांसाठी तिने गायले आहे. निती संगीताच्या क्षेत्रात सक्रिय असताना तिची बहीण शक्ती मोहन आणि मुक्ती मोहन डान्सर आहेत.

टॅग्स :नीति मोहन