Join us

बॉलिवूड सिंगर अरिजीत सिंगची आई रूग्णालयात दाखल,  A गटाच्या रक्ताची आहे गरज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 12:00 IST

अरिजीतच्या आईला त्वरित रक्ताची गरज आहे. ‘दिल बेचारा’ व ‘पाताललोक’ फेम अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी हिने याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे.

ठळक मुद्देअरिजीतने फिर ले आया दिल, तुम ही हो, मस्त मगन, मनवा लागे, छन्ना मेरेया यांसारखी अनेक हिट गाणी बॉलिवूडला दिलीत.

आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारा बॉलिवूड सिंगर अरिजीत सिंह ( Arijit Singh) याच्या आईची प्रकृती अचानक बिघडली असून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अरिजीतच्या आईला त्वरित रक्ताची गरज आहे. ‘दिल बेचारा’ व ‘पाताललोक’ फेम अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी हिने याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. (Singer Arijit Singh’s mother hospitalized in Kolkata)स्वस्तिकाने आज गुरूवारी सकाळी 10.07 मिनिटाला ट्विटरवर एक पोस्ट केली. यात तिने लिहिले, ‘अरिजीत सिंहच्या आईची प्रकृती बिघडली आहे. तिला ए ब्लडची गरज आहे.’ 

अरिजीतच्या आईला कोलकात्याच्या एएमआरआय, ढाकुरिया रूग्णालयात भरती करण्यात आले असून ब्लड डोनर पुरूषच हवा, असेही तिने तिच्या ट्विटमध्ये लिहिले आहे.अरिजीतच्या आईला काय झाले? कशामुळे रूग्णालयात भरती करण्यात आले, याबाबत सध्या काहीही स्पष्ट नाही.

अरिजीतने फिर ले आया दिल, तुम ही हो, मस्त मगन, मनवा लागे, छन्ना मेरेया यांसारखी अनेक हिट गाणी बॉलिवूडला दिलीत. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’मधील तुम ही हो, चाहू मैं या ना या गाण्यांमुळे तर त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

टॅग्स :अरिजीत सिंह