Join us
Daily Top 2Weekly Top 5

मी ५ फुटाच्या कुठल्याही ‘खान’चा फॅन नाही! अभिजीत भट्टाचार्य पुन्हा बोलला!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 19:19 IST

अभिजीतने पुन्हा एक नवा वाद ओढवून घेतला आहे, एका इव्हेंटमध्ये बोलताना त्याने सलमान खान आणि शाहरूख खान यांना लक्ष्य केले.

बॉलिवूड पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य याचे आणि वादांचे जुने नाते आहे. त्याचे नाव मीडियात आले रे आले की, कुठला ना कुठला वाद असणार, असे लोक मानून चालतात. होय, अभिजीतने पुन्हा एक नवा वाद ओढवून घेतला आहे, एका इव्हेंटमध्ये बोलताना त्याने सलमान खान आणि शाहरूख खान यांना लक्ष्य केले. माझ्या आवाजाने शाहरूख बॉलिवूडचा किंगखान बनला. माझ्या आवाजाने त्याला सुपरस्टार बनवले. जोपर्यंत मी त्याच्यासाठी गाणी गायलीत, तोपर्यंत तो रॉकस्टार होता. पण मी त्याच्यासाठी आवाज देणे बंद केले आणि तो ‘लुंगी डान्स’वर आला, असे अभिजीत म्हणाला. शाहरूखला आवाज देणे का बंद केले, हेही त्याने सांगितले. ‘मैं हू ना’मध्ये सिंगर सोडून सगळ्यांना दाखवण्यात आले. ‘ओम शांती ओम’मध्येही हेच झाले. सर्व स्टार्स दिसले. पण सिंगर्स गायब होते. शाहरूख माझ्या आवाजावर नाचत होतो; पण मी त्यांच्यासोबत नव्हतो. यामुळे माझा आत्मसन्मान दुखावला, असे अभिजीतने सांगितले. याच इव्हेंटमध्ये त्याने बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याच्यावरही निशाणा साधला. ‘दबंग खान’ आपल्या प्रत्येक चित्रपटात पाकिस्तानी गायकांना घेतो. भारतीय गायकांचा आवाज खराब आहे का? असा सवाल करत, सर्वप्रथम बॉलिवूडमधून पाकिस्तानी हद्दपार व्हायला हवेत, असे तो म्हणाला, तो केवळ इथेच थांबला नाही तर त्याने सलमानला चांगलेच फैलावर घेतले. सीमेवर आपले जवान शहिद होतात, अनेकजण आपला बाप गमावता, कुणी आपला मुलगा, कुणी पती गमावतो. पण सलमानने मात्र पाकिस्तानी गायकांना काम देण्याची जणू शपथ घेतली आहे. मी कधीच सलमानचा चाहता वा त्याचा पाठीराखा नव्हतो. मी त्याचा फॅन बनू, इतकी त्याची ती लायकीच नाही. चित्रपटाचा हिरो आहेस, म्हणून मला तो आवडावा, हे गरजेचे नाही. मी ५ फुटांच्या कुठल्याही ‘खान’चा फॅन नाही, असे अभिजीत म्हणाला. एकंदर काय तर अभिजीतने सलमान व शाहरूखशी पंगा तर घेतला. आता याचा पुढचा अध्याय कसा रंगतो, ते बघूच.

टॅग्स :अभिजीत भट्टाचार्यसलमान खानशाहरुख खान