Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ मल्होत्रासोबत कियारा अडवाणी काही वेळातच घेणार सात फेरे, लग्न मंडपातील पहिला फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 15:37 IST

मंडप सजला आहे. लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. आता प्रत्येकजण त्या क्षणाची वाट पाहत आहे, सिद्धार्थ-कियारा सात फेरे घेत आयुष्यभरासाठी एकमेकांचे होतील.

कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाची थीम गुलाबी रंगाची आहे. सिद्धार्थच्या लग्नासाठी दिल्लीहून खास बँड मागवण्यात आला आहे. जो गुलाबी रंगाचा पोशाख परिधान केलेला दिसत आहे. आज दुपारनंतर होणार्‍या सोहळ्यापूर्वी काही लोक ढोल वाजवताना आणि पगडी बांधताना दिसले.

मंडप सजला आहे... कियाराच्या हातावर मेहेंदीही लागली आहे. लग्नाच्या विधींना सुरूवात झाली आहे. आता प्रत्येकजण त्या क्षणाची वाट पाहत आहे, जेव्हा बॉलीवूडचे लव्ह बर्ड्स कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​सात फेरे घेत आयुष्यभरासाठी एकमेकांचे होतील.  सिद्धार्थ-कियारा यांच्या शाही लग्नासाठी जैसलमेरचा सूर्यगड पॅलेस नववधूप्रमाणे सजवण्यात आला आहे. या राजवाड्यात सिद्धार्थ आणि कियारा आज लग्न करून त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत.

सूर्यगड पॅलेसमधून राजस्थानी लोकगीतांचा आवाज येत आहे. बँड, बाजा आणि वऱ्हाडी सर्व तयार आहेत. आता थोड्याच वेळात मिरवणूक निघेल आणि कियारा-सिड लग्न करून कायमचे एकमेकांचे होतील.

 या लग्नासाठी या वर्हाडी मंडळीही पोहोचली असून यात करण जोहर, शाहिद कपूर, मीरा कपूर, मनीष मल्हाेत्रा, इशा अंबानी आदींचा समावेश आहे. अभिनेत्री जुही चावला पती जयमेहतांसोबत कियारा आणि सिद्धार्थला आर्शिवाद देण्यासाठी पोहोचली आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणी