Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sidharth-Kiara Wedding: अखेर सिडची झाली कियारा अडवाणी, सूर्यगड पॅलेसमध्ये घेतले सात फेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 18:21 IST

प्रत्येकजण त्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आलं शेरशाह कपल सिड-कियारा लग्न बंधनात अडकले.

अखेर कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी लगीनगाठ बांधली आहे. 7 फेब्रुवारीचा दिवस सिद्धार्थ आणि कियारासाठी त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस ठरला आहे. अग्नीच्या साक्षीने दोघांनी सात फेरे घेतले आहेत.या लग्नात दोघांचे कुटुंबीय आणि जवळच्या लोकांनी उपस्थित आहेत. सिड आणि कियारा आता आयुष्यभरासाठी एकमेकांचं झालं आहेत. 

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या विधी पूर्ण झाल्या आहेत. आजपासून दोघे पती-पत्नी झाले आहेत. या शाही विवाहात दोन्ही कुटुंबीयांनी आणि पाहुण्यांनी जोडप्याला आशीर्वाद दिले. सूर्यगड पॅलेस सिद्धार्थ आणि कियारा यांनी आज त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. 

 लग्नात सिद्धार्थ मल्होत्राने ग्रँड एन्ट्री केली. 'साजन जी घर आये' या गाण्यावर सिद्धार्थची एन्ट्री झाली. याशिवाय त्याच्या 'बार बार देखो' चित्रपटातील 'काला चष्मा' हे प्रसिद्ध गाणेही वाजलं. 

 करण जोहर, शाहिद कपूर, मीरा कपूर, मनीष मल्हाेत्रा, इशा अंबानी आदी या लग्नाला उपस्थित होते. अभिनेत्री जुही चावला पती जयमेहतांसोबत कियारा आणि सिद्धार्थला आर्शिवाद देण्यासाठी पोहोचली. 

 

टॅग्स :कियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्रा