Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ म्हणतो,‘भविष्याची काय शाश्वती ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 13:56 IST

 सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांची रिलेशनशिप हा सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. लंडनमध्ये ते दोघे नुकतेच ट्रीपवर गेले ...

 सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांची रिलेशनशिप हा सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. लंडनमध्ये ते दोघे नुकतेच ट्रीपवर गेले होते. तिथे कॅटरिनाच्या बर्थडे पार्टीतही ते सामील झाले होते. सिद्धार्थ त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलतांना म्हणाला,‘ सेलिब्रिटी आणि मीडिया यांची फारच इंटरेस्टिंग रिलेशनशिप असते. मी करणचा लेख वाचला. आम्ही एखाद्या पती-पत्नीप्रमाणे असतो.आमच्यातही नेहमी वाद होत असतात. तुम्ही तुमच्या पत्नीला सोडू शकत नाही. तुम्हाला तिच्यासोबत राहायला शिकवेच लागते. कितीही अवघड असले तरीही तुम्ही एकमेकांना बोलून दुखवू शकत नाही.त्यामुळे आलिया आणि माझ्या रिलेशनशिपविषयी बोलताना मी एवढेच म्हणेन की, मीडिया त्यांच्यापद्धतीने बातम्या पसरवते. आणि आम्हाला आमच्या भविष्याबद्दल कसलीच शाश्वती नसते. त्यामुळे आम्ही काहीच बोलू शकत नाही.’