Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ म्हणतो, ‘नो रोमान्स विद सोना’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2016 19:12 IST

‘बार बार देखो’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा कॅटरिना कैफसोबत रोमान्स करताना दिसला. सिद्धार्थ आणि कॅटची फ्रेश आॅनस्क्रीन जोडी लोकांना चांगलीच आवडली. ...

‘बार बार देखो’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा कॅटरिना कैफसोबत रोमान्स करताना दिसला. सिद्धार्थ आणि कॅटची फ्रेश आॅनस्क्रीन जोडी लोकांना चांगलीच आवडली. आता सिद्धार्थ -सोनाक्षी सिन्हा अशी फ्रेश जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘इत्तेफाक’ या आगामी चित्रपटात ही जोडी दिसणार आहे. १९६९ मध्ये आलेल्या राजेश खन्ना व नंदा यांच्या ‘इत्तेफाक’चा हा अधिकृत रिमेक आहे. ‘इत्तेफाक’ हा मर्डर मिस्ट्रीवर आधारित चित्रपट होता. त्याचा रिमेकही याच वळणाने जाणार आहे. पण यात सिद्धार्थ व सोनाक्षी कपल म्हणून नाही तर वेगळ्याच भूमिकेत आहेत. खुद्द सिद्धार्थनेच याबद्दल माहिती दिली.  मी सोनाक्षीसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. पण चित्रपटात मी सोनाक्षीसोबत रोमान्स करताना दिसणार नाही. या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री आहे.  चित्रटाच्या दिग्दर्शकांनी कथेत बरेच बदल केले आहेत. चित्रपटाची कथा तीन व्यक्तिंभोवती फिरताना दिसेल. या तिघांचाही एक भूतकाळ आहे. तसेच, त्यांच्याकडे खून करण्याचे कारणही आहे. ही  मर्डर मिस्ट्री पाहणे प्रेक्षकांसाठी इंटरेस्टिंग असेल, असे सिद्धार्थने सांगितले.