Join us

सिद्धार्थ-कॅटरिनाचा ‘जीव रंगला...गुंगला...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 10:08 IST

‘जीव रंगला...गुंगला..’ हे काही गाणे नाही तर परिस्थिती आहे सिद्धार्थ आणि कॅटरिनाच्या मनाची. होय, हे अगदी खरं आहे. ते एकमेकांच्या प्रेमात एवढे आकंठ बुडाले आहेत

 ‘जीव रंगला...गुंगला..’ हे काही गाणे नाही तर परिस्थिती आहे सिद्धार्थ आणि कॅटरिनाच्या मनाची. होय, हे अगदी खरं आहे. ते एकमेकांच्या प्रेमात एवढे आकंठ बुडाले आहेत की, त्यांना त्यांच्या प्रेमासमोर कुणीच दिसत नाहीये.तुम्ही आणखी काही दुसरा अर्थ काढण्याअगोदर हे सांगणे गरजेचे आहे की, ते दोघे त्यांच्या आगामी चित्रपटाच्या भूमिकांमुळे असा विचार करत आहेत. त्यांचा आगामी चित्रपट ‘बार बार देखो’ ची प्रदर्शनाची तारीख जवळ आली असून नुकताच त्यातील एक स्टील आऊट करण्यात आला आहे.हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्याला कॅप्शन देण्यात आले आहे की,‘ व्हेन यू फार्इंड द वन, फॉरेव्हर बिकम्स पॉसिबल!  बार बार देखो लव्ह मोमेंट्स.’सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांचा हा एकत्र पहिलाच चित्रपट आहे. दिग्दर्शक नित्या मेहरा यांच्या या चित्रपटाचे ग्लॅसगो, स्कॉटलंड, क्राबी, थायलंड आणि दिल्ली येथे शूटींग करण्यात आले.