सिद्धार्थ ‘बॅक इन अॅक्शन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 13:58 IST
‘बार बार देखो’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा एकदम रोमँटिक रूपात होता. आता त्याने ‘रिलोडेड’ मध्ये अॅक्शन लुक बनवला आहे. त्याने ...
सिद्धार्थ ‘बॅक इन अॅक्शन’
‘बार बार देखो’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा एकदम रोमँटिक रूपात होता. आता त्याने ‘रिलोडेड’ मध्ये अॅक्शन लुक बनवला आहे. त्याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून त्याला कॅप्शन देण्यात आले आहे की,‘बॅक इन अॅक्शन’.या फोटोत सिद्धार्थ फाईटिंग करताना दिसत आहे. आत्तापर्यंत तो या अवतारात कधीही दिसला नाही अशा लुकमध्ये तो आता दिसेल. या चित्रपटात सिद्धार्थसोबत जॅकलीन फर्नांडिस दिसणार आहे.चित्रपटाचे शूटींग थायलंडमध्ये सुरू आहे. राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांचे दिग्दर्शन चित्रपटाला मिळाले आहे. हा चित्रपट हृतिक आणि कॅटरिनाच्या ‘बँग बँग’ चित्रपटाचा प्रिक्वेल असणार आहे.