Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सिद्धार्थ-आलियात कट्टी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 17:27 IST

होय, प्रेम म्हटलं की तिथं लहानमोठी भांडण आणि तक्रारीही आल्याच. सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट हे कपलही याला अपवाद ...

होय, प्रेम म्हटलं की तिथं लहानमोठी भांडण आणि तक्रारीही आल्याच. सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट हे कपलही याला अपवाद नाही. या दोघांमध्येही लहानमोठ्या कुरबुरी सुरु राहतातच. अलीकडे एका पार्टीत आलिया व सिद्धार्थ यांच्यात कुठल्याशा कारणावरून भांडण झाल. एका बर्थ डे पार्टीत दोघेही सोबत गेले होते. मात्र अचानक दोघांमध्ये काहीतरी बिनसलं. मग काय, सिद्धार्थ एकटा पार्टीतून निघून गेला. तोपर्यंत दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं कानोकानी झालं. यापूर्वीही एका पार्टीत आलिया व सिद्धार्थ यांच्यात असाच वाद झाला होता. मात्र तेव्हा दोघांनीही समजुतीने घेत, तो वाद विकोपाला जाऊ दिला नव्हता आणि दोघेही सोबतच पार्टीतून निघून गेले होते. आलिया व सिद्धार्थ दोघेही सध्या आपआपल्या कामात प्रचंड बिझी आहेत. आलिया ‘उडता पंजाब’मध्ये तर सिद्धार्थ ‘बार बार देखो’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तेव्हा कट्टी फार काळ बरी नाही...होय ना?