Join us

​सिद्धार्थ येणार आलियाच्या ‘जवळ’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 13:41 IST

आलिया भट्ट व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात दुरावा आलाय, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे म्हणता येईल. कारण सिद्धार्थ ...

आलिया भट्ट व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात दुरावा आलाय, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे म्हणता येईल. कारण सिद्धार्थ लवरकच आलियाच्या ‘जवळ’ येणार आहे. होय, म्हणजेच  सिद्धार्थ येत्या काही दिवसांत आलिया राहायला येत असलेल्या जुहू भागात राहायला येणार आहे. जुहूत त्याला नवे घर मिळाले आहे. येत्या आठवडाभरात आलिया तिच्या आई-वडिलांच्या घरातून स्वत:च्या घरात शिफ्ट होणार आहे. याच भागात सिद्धार्थलाही सी-फेसिंग घर मिळाले आहे. गेल्या वर्षभरापासून सिद्धार्थला सी-फेसिंग घराच्या शोधात होता. लवकरच हे नवे घर रिनोवेट करून सिद्धार्थ त्याठिकाणी राहायला येतोय. सिद्धार्थचे हे नवे घर आलियाच्या नव्या घरापासून बरेच जवळ आहे. म्हणजेच आलिया व सिद्धार्थ आणखी जवळ येऊ पाहताहेत. आहे ना खूशखबर!!