Join us

सिद्धार्थने शेअर केला ‘फनी व्हिडीओ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 13:24 IST

‘ ए, थप्पड से डर नही लगता साब, अकिरा से लगता है. वॉच आऊट फॉर धीस न्यू अ‍ॅक्शन गर्ल. शी इज गॉना किक सम बट आॅन सेकंड सप्टेंबर.

 बॉलीवूड सेलिब्रिटी सध्या एकमेकांचे चित्रपट, व्हिडीओ, फनी व्हिडीओ, मेसेजेस यांचे प्रमोशन के ले जात आहे. चित्रपटाविषयी कलाकारांना बेस्ट विशेस देण्यात येत आहेत. अक्षय कुमारच्या ‘रूस्तम’ चित्रपटावेळी रणवीर सिंग, आलिया भट्ट, वरूण धवन, सलमान खान अशा अनेकांनी प्रमोशन केले होते.तर टायगर-जॅकलीनच्या ‘अ फ्लार्इंग जट’ मधील ‘बीट पे बुट्टी’ या गाण्यावर अनेकांनी डान्स करून व्हिडीओ अपलोड केले. आता सोनाक्षी सिन्हाच्या ‘अकिरा’ चित्रपटासाठी सर्वांनी कंबर कसली आहे. नुकतेच सिद्धार्थ मल्होत्रा याने एक फनी व्हिडीओ शेअर केला आहे.ज्याला त्याने कॅप्शन दिले आहे की,‘ वॉच आऊट बॉईज धीस गर्ल मिन्स बिझनेस अकिरा कमिंग धीस फ्राईडे, किल इट बिग हग.’ व्हिडीओत तो स्वत:लाच थप्पड मारतो आणि म्हणतो की,‘ ए, थप्पड से डर नही लगता साब, अकिरा से लगता है. वॉच आऊट फॉर धीस न्यू अ‍ॅक्शन गर्ल. शी इज गॉना किक सम बट आॅन सेकंड सप्टेंबर. बेस्ट आॅफ लक सोनाक्षी.’