Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतचे घर सोडताना 8 जूनला सिद्धार्थ पिठानीला हा खास निरोप देऊन निघाली होती रिया चक्रवर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 10:53 IST

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआयने नुकतीच सिद्धार्थ पिठानीची चौकशी केली.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआयने नुकतीच सिद्धार्थ पिठानीची चौकशी केली. सिद्धार्थने सीबीआयच्या समोर अनेक धक्केदायक खुलासे केले. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार सिद्धार्थने सांगितले की 8 जूनला सुशांतचे घर सोडून गेली होती रिया. सकाळी 11.30 च्या सुमारास रियाने बॅक भरून निघाली होती. रियाने सिद्धार्थला सुशांतची काळजी घ्यायला सांगितली. त्यावेळी सुशांतने रियाला मिठी मारुन बाय म्हणाला होता.  

सिद्धार्थ पुढे म्हणाला, थोड्यावेळा नंतर सुशांतची बहीण मीतू घरी आली. मितू दीदीने सुशांतला जेवायला सांगितले पण सुशांत जास्त जेवला नाही.ती सुशांतला आमच्याशी बोलायला लावण्याचा प्रयत्न करीत होती पण सुशांतने यात रस दाखविला नाही. मीतू दीदी घरी असताना सुशांत जुन्या गोष्टी आठवून रडत होता. त्याच दरम्यान सुशांतला दिशाच्या मृत्यूची बातमी कळली आणि तो अस्वस्थ झाला.  श्रृती मोदीच्या पायाला दुखापत झाल्यामुळे दिशा काही दिवस सुशांतच्या मॅनेजरचे काम सांभाळत होती. सुशांतने मला त्या रात्री त्याच्या बेडरूममध्ये झोपण्यास सांगितले.  सिद्धार्थने सांगितले की जानेवारीत रिया सुशांतला पहिल्यांदा सोडून गेली होती. काही दिवसांनी रिया परत आली. रियाने मला सांगितले की आता, रिया आणि दीपेश एकत्र सुशांतची काळजी घेऊया.

 

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्रुटी 

सध्या सीबीआय या प्रकरणाचा अधिक तपास करते आहे. सीबीआयने नियुक्त केलेले एम्सचे फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. सुधीर गुप्ता यांनी प्राथमिकदृष्ट्या या पोस्टमार्टम रिपोर्टमधील काही ठळक त्रूटींवर नेमके बोट ठेवले आहे. सीबीआयने पोस्टमार्टम रिपोर्टची फेरतपासणी करण्यासाठी एम्सच्या चार डॉक्टरांची एक टीम तयार केली आहे. डॉ. सुधीर गुप्ता या टीमचे नेतृत्व करत आहेत. ही टीम सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर आपले मत देतील.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती