सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे हिंदी सिनेसृष्टीतील मोस्ट रोमँटिक कपलपैंकी एक आहेत. नुकतंच सिद्धार्थचा 'परम सुंदरी' चित्रपट प्रदर्शित झालाय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये आला होता. यावेळी कपिल शर्माने त्याला त्याच्या आणि कियाराच्या भांडणाबद्दल मजेशीर प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर ऐकून सगळेच हसू आवरू शकले नाहीत.
कपिलने सिद्धार्थला विचारले, "तुमचे लग्न होऊन बराच काळ झाला आहे, मग तुमचे भांडण कशावरून होते?" यावर सिद्धार्थने उत्तर दिले, "एक गोष्ट अशी आहे की तिला (कियाराला) गीझर नेहमी चालू हवा असतो. तिला गरम पाण्याने आंघोळ करायला आवडते. अगदी मुंबईच्या उन्हाळ्यातही... आणि मला थोड्या थंड पाण्याने आंघोळ करायला आवडते". याच शोमध्ये सिद्धार्थने सांगितले की, त्याच्या कुटुंबातील सदस्य मुलीसाठी वेगवेगळी नावे सुचवत आहेत, पण अद्याप त्यांनी कोणतेही नाव निश्चित केलेले नाही.
सिद्धार्थ आणि कियाराचे लग्न ७ फेब्रुवारी २०२३ रोजी जैसलमेरमध्ये मोठ्या थाटात पार पडले होते. आता हे दोघेही आई-बाबा झाले आहेत. १५ जुलै रोजी कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अद्याप त्यांनी मुलीचा चेहरा आणि नाव दोन्हीही जाहीर केलेले नाही. दरम्यान, कियाराच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती नुकतीच 'वॉर २' मध्ये दिसली होती, ज्यात तिचा बोल्ड लूक प्रेक्षकांनी पसंत केला. याव्यतिरिक्त, ती लवकरच 'डॉन ३' मध्येही दिसणार असल्याची चर्चा आहे.