Param Sundari release date postponed: सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांचा 'परम सुंदरी' सिनेमा लवकरच येणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर आला होता. '२ स्टेट्स' सारखीच याही सिनेमाचं कहाणी आहे. जान्हवी आणि सिद्धार्थ ही फ्रेश जोडी पडद्यावर येणार असल्याने चाहतेही उत्सुक आहेत. मात्र आता सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखच पुढे नेण्यात आली आहे. आता ही रोमँटिक कॉमेडी फिल्म कधी रिलीज होणार?
'परम सुंदरी' सिनेमाचा टीझर मे महिन्यात आला होता. मात्र सिनेमाबाबतीत कोणीही अपडेट समोर आली नाही. याच महिन्यात २५ जुलै रोजी सिनेमा रिलीज होणार होता. मात्र आता तो ऑगस्ट मध्ये रिलीज केला जाणार आहे. राजकुमार रावचा 'मालिक' सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमावेळी थिएटरमध्ये 'परम सुंदरी'चा टीझर दाखवण्यात आला. त्यात नवी रिलीज डेट समोर आली. सिनेमा ऑगस्ट महिन्यात येत आहे हे त्यातून स्पष्ट झालं. रिलीज डेट पुढे नेण्याबद्दल अद्याप मेकर्सने अधिकृत घोषणा केलेली नाही. २५ जुलै रोजी अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार २' रिलीज होणार आहे. त्यासोबत क्लॅश नको म्हणून 'परम सुंदरी' पुढे ढकलला असल्याची चर्चा आहे.
'परम सुंदरी'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा उत्तरेकडचा मुलगा आहे तर जान्हवी दक्षिणेकडेची आहे. त्यांच्या लव्हस्टोरीवर सिनेमा आधारित आहे. सिद्धार्थ-जान्हवीची जोडी, रोमँटिक गाणी, सिनेमातील त्यांचे कॉस्च्युम यामुळे याची उत्सुकता वाढली आहे. मात्र आता सिनेमासाठी आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे. मॅडॉक बॅनर अंतर्गत तुषार जलोटा यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे.