Join us

​सिद्धार्थ मल्होत्रा नाही तर ‘या’ एक्स-बॉयफ्रेन्डसोबत पार्टी करताना दिसली आलिया भट्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 15:04 IST

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा आता रिलेशनशिपमध्ये नाहीत. दोघांचेही ब्रेकअप झालेय, हे तुम्हाला ठाऊक आहे. आता या ब्रेकअपमागचे कारण ...

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा आता रिलेशनशिपमध्ये नाहीत. दोघांचेही ब्रेकअप झालेय, हे तुम्हाला ठाऊक आहे. आता या ब्रेकअपमागचे कारण काय, हे पक्के सांगता येणार नाही. पण या ब्रेकअपसाठी जॅकलिन फर्नांडिस जबाबदार असल्याचे मानले जात आहे.सूत्रांचे मानाल तर, ‘अ जेंटलमॅन’चे शूटींग सुरु असताना सिद्धार्थ व जॅक यांच्यातील क्लोजनेस वाढला. शूटींग संपल्यानंतर दोघांचेही एकत्र डिनर, लाँग ड्राईव्ह असे सगळे एन्जॉय करणे सुरु असतानाच ही बातमी आलियाच्या कानावर गेली. आलियाने त्याचवेळी सिद्धार्थपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण सिद्धार्थ शूटींग संपल्यावर भारतात परत आला आणि त्याने आलियाशी पॅचअप केले.   मात्र आता आलिया सिद्धार्थच्या आयुष्यातून कायमची गेलीय. (खरे तर आलिया व सिद्धार्थने कधीच आॅफिशिअली कधीच त्यांचे रिलेशन मान्य केले नाही. ज्या काही बातम्या आल्यात, त्या बी-टाऊनमधून. अर्थात बॉलिवूडचे सेलिब्रिटी कधीच आपले नाते स्वीकार करत नाहीत.) याचा पुरावा म्हणजे, आलियाचा ताजा फोटो. होय, हा फोटो पाहिल्यानंतर सिद्धार्थचा किती जळफळाट होईल, हे सांगता येणार नाही. पण तो होईल, इतके मात्र नक्की.कारण या फोटो आलिया दुसºया कुणासोबत नाही, तिचा एक्स बॉयफ्रेन्ड अली दादरकरसोबत दिसतेय. या फोटोत अली दिसतोय. शिवाय आलियाची मैत्रिण आकांक्षा रंजनही आहे. आलिया व अलीची या फोटोतील केमिस्ट्रीही खास वाटतेय. आलिया व अली दोघेही स्कूल फ्रेन्ड आहेत. मुुंबईत राहणारा अली आता लंडनला शिफ्ट झाला आहे. अली व आलिया हे दोघे बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते, असे मानले जाते. मात्र ‘स्टुडंट आॅफ दी ईअर’मधून आलियाने बॉलिवूड डेब्यू केला आणि यानंतर आलिया व अलीच्या वाटा वेगवेगळ्या झाल्यात. यानंतर आलियाचे नाव सिद्धार्थ मल्होत्राशी जोडले गेले.  ALSO READ : आलिया भट्टच्या चाहत्यांना मिळणार एक सरप्राईज! वाचा, सविस्तर!!आलिया सध्या काश्मीरमध्ये आहे. लवकरच आलियाचा ‘राजी’ हा सिनेमा येतोय. यात ती विक्की कौशलसोबत दिसणार आहे. या चित्रपटानंतर रणवीर सिंहसोबत ‘गल्ली बॉय’ आणि रणबीर कपूरसोबत ‘ड्रगन’मध्ये आलिया बिझी होणार आहे.