सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपट 'डिअर कॉम्रेड'चा हिंदी रिमेक येणार आहे. २०१९ साली आलेल्या ओरिजनल सिनेमात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना ही जोडी दिसली होती. तेव्हाच करण जोहरने सिनेमाचे राइट्स खरेदी केले होते. आता तो हिंदीत सिनेमा बनवण्याच्या तयारित आहे. या सिनेमात सिद्धांत चतुर्वेदी आणि प्रतिभा रांटा ही फ्रेश जोडी दिसेल अशी चर्चा झाली. पण प्रतिभा रांटाने ही केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं. तर आता सिद्धांत चतुर्वेदीनेही आपण या सिनेमाचा भाग नसल्याचं जाहीर केलं आहे.
सिद्धांत चतुर्वेदीने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर स्पष्टीकरण दिलं आहे. 'डिअर कॉम्रेड'च्या रिमेकमध्ये दिसणार या बातम्यांचं त्याने खंडन केलं आहे. त्याने लिहिले, "मला हे स्पष्ट करायचं आहे की हे खरं नाही. मला आता यापुढे रिमेकमध्ये काम करायचं नाही. मी डिअर कॉम्रेड या ओरिजनल सिनेमाचा मोठा चाहता आहे आणि त्यातल्या कलाकारांचाही चाहता आहे. त्यांच्यासाठी प्रेम आणि खूप आदर आहे. तरी मला रिमेकमध्ये काम करण्याची इच्छा नाही. तसंच टॅलेंटेड प्रतिभा रांटासोबत इतर कोणत्याही ओरिजनल प्रोजेक्टमध्ये काम करायला मला आवडेल. वाट बघतोय."
सिद्धांत चतुर्वेदी नुकताच 'धडक २' सिनेमात दिसला होता. हा करण जोहरचा सिनेमा होता. या सिनेमातील सिद्धांतच्या अभिनयाचं कौतुक झालं. मात्र बॉक्स ऑफिसवर सिनेमाने फारसं यश मिळवलं नाही. यामुळेच सिद्धांत करणवर नाराज असल्याने त्याने डिअर कॉम्रेडच्या रिमेकलाही नकार दिल्याची चर्चा बीटाऊनमध्ये झाली. आता 'डिअर कॉम्रेड'च्या हिंदी रिमेकमध्ये कोण दिसणार यावर अद्याप ऑफिशियल कन्फर्मेशन आलेलं नाही.
Web Summary : Siddhant Chaturvedi clarified he won't star in the 'Dear Comrade' Hindi remake, despite rumors. He expressed admiration for the original film and its actors, preferring original projects. He'd like to work with Pratibha Ranta on something new. The remake's cast remains unconfirmed.
Web Summary : सिद्धांत चतुर्वेदी ने स्पष्ट किया कि वे 'डियर कॉमरेड' के हिंदी रीमेक में नहीं होंगे। उन्होंने मूल फिल्म और अभिनेताओं की प्रशंसा की और मौलिक परियोजनाओं को प्राथमिकता दी। वे प्रतिभा रांटा के साथ कुछ नया काम करना चाहते हैं। रीमेक की कास्ट अभी भी अपुष्ट है।