श्वेता त्रिपाठी म्हणते; ‘मी कधीच फेअरनेस क्रिमचा प्रचार करणार नाही’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 20:30 IST
नवाजुद्दीन सिद्दीकी व श्वेता त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘हरामखोर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटासाठी नवाजुद्दीन ...
श्वेता त्रिपाठी म्हणते; ‘मी कधीच फेअरनेस क्रिमचा प्रचार करणार नाही’
नवाजुद्दीन सिद्दीकी व श्वेता त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘हरामखोर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटासाठी नवाजुद्दीन सोबत श्वेता त्रिपाठी हिच्या अभिनयाची प्रशंसा होत आहे. श्वेता त्रिपाठीने हरामखोर या चित्रपटातील साकारलेल्या भूमिकेनंतर ‘मी कधीच फेअरनेस क्रिमचा प्रचार करणार नाही’ असे मत व्यक्त केले आहे. श्वेता त्रिपाठी म्हणाली, मी कधीच फेअरनेस क्रिमची जाहिरात करणार नाही. या वयात आणि या काळात मला अशी जाहिरात करणे अपमानकारक वाटते. अशा जाहिरातीमधून लोकांना आपला चेहरा उजळण्यासाठीच्या भूलथापा द्याव्या लागतात. गोरे झाल्याने किंवा चेहरा उजळल्याने आपले नशीब उजळत नाही. नशिबाचा त्वचेच्या रंगाशी काहीच संबध नाही. यासोबतच मी यापुढे कोणतेही फुड प्रॉडक्ट्सची जाहिरात करणार नाही. यापूर्वी अशा जाहिराती मी केल्या आहेत. असे नाही की मला फास्ट फुड किंवा नॉनव्हेज आवडत नाही तो प्रत्येकाचा प्रश्न आहे, मात्र असे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात हे आपण सर्वांना माहिती आहे. ‘मसान’मधील श्वेता त्रिपाठीने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. या चित्रपटामुळे माझ्यात अधिक जबाबदारीची भावना निर्माण झाली असल्याचे ती सांगते. यापूर्वी तिने एका फास्ट फूडची जाहिरात केली होती. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या तिच्या दुसºया चित्रपटानंतर मी फास्टफूडच्या जाहिराती न करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही ती म्हणाली. माझ्या समाजाप्रती काही जबाबदाºया आहेत त्याची जाणीव ठेऊन मी असा निर्णय घेतला आहे, समाजाची अधोगती करण्यापेक्षा प्रगती करण्याच्या बाबींवर माझा भर असेल, असेही श्वेता त्रिपाठी म्हणाली. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या सोबत ‘हरामखोर’ या चित्रपटात झळकलेल्या ३१ वर्षीय श्वेताने १४ वर्षाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. लोकांना मी ३१ वर्षांची असेल यावर विश्वासच बसत नाही असे तिने काही दिवसांपूर्वी सांगितले होते.