श्वेता बासू प्रसादने वर्षभर लपवून ठेवली एवढी मोठी गोष्ट! अखेर झालाचं खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 10:46 IST
‘मकडी’ या चित्रपटातील मुन्नी तुम्हाला आठवत असेलचं. ती मुन्नी म्हणजेच अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद. एकता कपूरच्या ‘चंद्रचंदिनी’ या मालिकेत ...
श्वेता बासू प्रसादने वर्षभर लपवून ठेवली एवढी मोठी गोष्ट! अखेर झालाचं खुलासा!!
‘मकडी’ या चित्रपटातील मुन्नी तुम्हाला आठवत असेलचं. ती मुन्नी म्हणजेच अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद. एकता कपूरच्या ‘चंद्रचंदिनी’ या मालिकेत श्वेता दिसली होती. तर सांगायचे हे की, मुन्नी आता मोठी झालीय आणि केवळ मोठीचं नाही तर तिचा साखरपुडाही झालाय. बॉयफ्रेन्ड रोहित मित्तल याच्यासोबत श्वेताने गुपचूप साखरपुडा उरकला. कधी तर वर्षभरापूर्वीच. होय, वर्षभरापूर्वीच श्वेता आणि रोहित यांचा साखरपुडा झालाय. पण आत्ता कुठे त्याचा खुलासा झालाय. श्वेताने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २७ वर्षांची श्वेता गत चार वर्षांपासून ३१ वर्षांच्या रोहित मित्तला डेट करत होती. श्वेता व रोहित दोघेही फिल्म इंडस्ट्रीशी सबंधित आहे. या दोघांनाही जवळ आणण्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मोठी भूमिका आहे. एका शॉर्टफिल्ममध्ये श्वेता व रोहित यांनी एकत्र काम केले होते. पुढे त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर प्रेम. श्वेता व रोहितच्या जवळच्या मित्रांचे मानाल तर सर्वप्रथम श्वेतानेचं रोहितला प्रपोज केले होते. गोव्यात तिने रोहितला प्रपोज केले. यानंतर रोहितने पुण्यात श्वेताला लग्नाची मागणी घातली होती. यासंदर्भात श्वेताशी संपर्क साधला असता, तिने साखरपुड्याची बातमी खरी असल्याचे सांगितले. होय, आमचा साखरपुडा झालाय. पण आम्हाला आमच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे नाही, असे ती म्हणाली. ALSO READ : या बॉलिवूडच्या अभिनेत्रीला पडकण्यात आले सेक्स रॅकेटमध्येतूर्तास श्वेता विवेक अग्निहोत्रीच्या ‘द ताश्कंद फाईल्स’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात नसीरूद्दीन शहा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यापूर्वी दोनदा श्वेताने नसीरूद्दीन यांच्यासोबत काम केलेय. २०१४ मध्ये श्वेता हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये एका सेक्स स्कँडलमध्ये अडकली होती. यामुळे दोन महिने तिला रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आले होते. पुढे हैदराबाद सेशन कोर्टने तिला क्लिनचीट दिली होती. या घटनेने श्वेताच्या करिअरवर मोठा परिणाम झाला होता. सेक्स स्कँडलमध्ये नाव आल्यानंतर पुढची दोन-एक वर्ष श्वेताना बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले होते. २०१७ मध्ये ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’मध्ये भूमिका मिळाली. चित्रपटांशिवाय तिने ‘कहानी घर घर की’ आणि ‘करिश्मा का करिश्मा’ अशा टीव्ही मालिकांतही काम केले आहे. रोहितबद्दल सांगायचे तर तो एक दिग्दर्शक आहे.