Join us
Daily Top 2Weekly Top 5

वहिनी ऐश्वर्याच्या 'या' गोष्टीचा श्वेता नंदाला येतो प्रचंड राग, सगळ्यांसमोर केला होता खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 09:45 IST

हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचं आणि प्रतिष्ठेचे स्थान असलेले कुटुंब म्हणजे बच्चन कुटुंब. बच्चन सिर्फ नाम ही काफी है असं म्हटलं जातं.

हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचं आणि प्रतिष्ठेचे स्थान असलेले कुटुंब म्हणजे बच्चन कुटुंब. बच्चन सिर्फ नाम ही काफी है असं म्हटलं जातं. महानायक बिग बी अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन आणि सून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यामुळे बच्चन कुटुंब कायमच प्रसिद्धीच्या झोतात असतं.

बच्चन कुटुंबियातली छोट्यातल्या छोट्या गोष्टीचीही चर्चा होते. त्यातही एक ऐश्वर्या आणि नणंद श्वेता नंदाचा एक किस्साही प्रचंड चर्चेत असतो. श्वेताची लेक नव्या नवेलीने पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करत डेब्यू केला. ज्याचा व्हिडीओ श्वेताने सोशल मीडियावर शेअर केला होता. या फॅशनवीकमध्ये ऐश्वर्या रायदेखील सहभागी झाली होती. पण श्वेताने तिला टॅग केलं नाही. यावरुन श्वेताला सोशल मीडियावर ट्रोलदेखील करण्यात आलं होतं. हे पहिलीवेळ नाही जेव्हा नणंद-भावजमधला वाद सगळ्यांसमोर आला. 

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये जेव्हा श्वेता बच्चनला ऐश्वर्याबद्दल विचारले गेले तेव्हा ती म्हणाली की तिला ऐश्वर्याच्या सर्व गोष्टी आवडतात पण तिच्या एका सवयीमुळे तिला खूप वाईट वाटते. ऐश्वर्या फोन व मेसेजचे उत्तर कधीच देत नाही. यामुळे मला तिचा खूप राग येतो पण आजपर्यंत फोन आणि मेसेजला उत्तर का देत नाही हे माहित नाही. याचदरम्यान करणने श्वेताला अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये उत्कृष्ट कलाकार कोण असा प्रश्न विचारला. यावेळी श्वेताने भावाची बाजू घेत अभिषेकचं नाव घेतले होते.

नुकताच अमिताभ बच्चन यांनी त्यांचा ८१ वा वाढदिवस साजरा केला. बिग बींना त्यांचा हा वाढदिवस संपूर्ण कुटुंबासोबत साजरा केला. श्वेता नंदाने सेलिब्रेशनचा एक फोटो सोशल मीडियावरही शेअर केला ज्यात नव्या, आराध्या, अगस्त आणि जया बच्चन दिसत होत्या. तोच फोटो ऐश्वर्याने शेअर करताना मात्र सगळ्यांना क्रॉप करत फक्त अमिताभ आणि आराध्याचाच फोटो ठेवला. यावरुन नेटकऱ्यांनी तिला देखील ट्रोल केलं.  

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन