Join us
Daily Top 2Weekly Top 5

​करण-बिपाशाचे थाटात ‘शुभ मंगल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 16:03 IST

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये ज्या लग्नाची चर्चा जोरात सुरू होती ते हाय-प्रोफाईल लग्न अखेर काल पार पडले.  बिपाशा बसू ...

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये ज्या लग्नाची चर्चा जोरात सुरू होती ते हाय-प्रोफाईल लग्न अखेर काल पार पडले.  बिपाशा बसू आणि करणसिंग ग्रोव्हर यांनी सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेतली. पंजाबी आणि बंगाली अशा दोन्ही पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला.पारंपरिक बंगाली वेशभूषेत बिपाशा अतिशय सुंदर दिसत होती. डोक्यावर पांढरे ‘टिआरा’ आणि माथी चंदनाने ती सजलेली होती. मात्र संपूर्ण सोहळ्यात लक्ष वेधले ते करणसिंगने. नवरदेवाने घोड्यावर बसून नाही तर सेगवे हॉव्हरबोर्डवर पांढरी शेरवानी घालून लग्नमंडपात एन्ट्री केली.मेहंदी आणि संगीत कार्यक्रमाच्या वेळी काढलेल्या करण-बिपाशाच्या फोटोंनी मंडपाची कमान सजवण्यात आली होती. पाहुणेमंडळींत बिपाशाचा एक्स बॉयफ्रेंड डिनो मोरिया, मॉडेल कँडाईस पिंटो यांचा सामावेश होता. सपना मोती भवानीने इन्टाग्रामवर या बिपाशाचा लग्नातील फोटो शेअर केले. गुरुवारी बिपाशाच्या घरी बंगाली परंपरेनुसार लग्नकार्यात केल्या जाणारे सर्व विधी करण्यात आले. शुक्रवारी झालेल्या संगीतमध्ये शिल्पा व शमिता शेट्टी, अनुषा दांडेकर यांनी तिच्यासोबत भरपूर धमाल केली. जॉन अब्राहमशी ब्रेक अप झाल्यावर बिपाशाचे ‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर करणशी सूत जुळले होते.