Join us

'बेस्ट लॉकडाऊन..' म्हणत, कमल हसनची लेक श्रुती हसनने शेअर केला बॉयफ्रेंडसोबता रोमाँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 14:31 IST

अभिनेत्रीने शंतनु हजारिकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन  (Shruti Haasan) तिचा बॉयफ्रेंड शंतनू हजारिका(Santanu Hazarika)सोबत लॉकडाउनमध्ये क्वालिटी टाइम स्पेंट करते आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली श्रुती हासनने इन्स्टावर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. अभिनेत्रीने शंतनु हजारिकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोत श्रुती   शंतनू हजारिकाच्या गळ्यात हात घालुन  दिसत आहे. याफोटो श्रुती हासनने लिहिले, 'बेस्ट लॉकडाउन , मी आभारी आहे'.

श्रुति हासन आणि शंतनू हजारिका त्यांच्या नात्यावर कधीच उडघपणे बोलले नाही. मात्र, दोघेही बर्‍याचदा सोशल मीडियावर रोमँटिक पोस्ट शेअर करतात. 2008 मध्ये ‘लक’ या बॉलिवूड चित्रपटातून श्रुतीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. यानंतर 2011 मध्ये तेलगू इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. हा सिनेमाही आपटला. पण यानंतर तिने साऊथमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत. श्रुती प्रसिद्ध अभिनेता कमल हासन आणि अभिनेत्री सारीका यांची मोठी मुलगी आहे.  श्रुतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘सलार’ या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाला केजीएफ दिग्दर्शक प्रशांत नीलने दिग्दर्शित केले आहे. या अ‍ॅक्शन थ्रीलर सिनेमात श्रुती सुपरस्टार प्रभाससोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

टॅग्स :श्रुती हसन