Join us

श्रिया सरन मार्चमध्ये या शहरात करणार डेस्टिनेशन वेंडिग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 15:33 IST

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा ट्रेंड सुरु आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण विराट-अनुष्काच्या लग्नानंतर अनेक सेलिब्रेटींच्या लग्नाची चर्चा ...

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा ट्रेंड सुरु आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण विराट-अनुष्काच्या लग्नानंतर अनेक सेलिब्रेटींच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. या यादित आणखीन एक नाव सहभागी झाले आहे आणि ते आहे अभिनेत्री श्रिया सरनचे. साऊथ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया आपल्या रशियन बॉयफ्रेंड बरोबर विवाह बंधनात अडकणार आहे. ती ह्या मार्चमध्ये लग्न करणार असल्याचे वृत्त आहे.  श्रिया डेस्टिशन वेडिंग करणार असून तिने यासाठी राजस्थानची निवड केली आहे. तीन दिवस हा लग्न सोहळा चालणार आहे.  श्रेयाने ह्याबद्दलची काहीच माहिती अजून कोणाला दिली नाही.जेव्हा  श्रियाला ह्याबद्दल विचारले गेले तेव्हा ती म्हणाली " माझे आयुष्य रोमांचकारी गोष्टींनी भरलेलं आहे. तुम्ही मला माझ्या करिअर बाबत प्रश्न विचार पण वैयक्तित आयुष्याबाबत नाही. मी एक अभिनेत्री आहे आणि मी माझ्या चित्रपटाविषयी बोलायला मी इथे आली आहे.''  श्रियाने भलेही यावर बोलायला तयार नाही पण अशा बातम्या जास्त वेळ लपून राहत नाही. श्रियाचे लग्न राजस्थानमधल्या उदयपूर मध्ये शाही पद्धतीने १७ मार्च रोजी होणार आहे. श्रियाच्या कुटुंबातील सर्व सदस्य लग्नाच्या तयारीला लागले आहेत. हा लग्नसोहळा उदयपूर मध्ये तीन दिवस चालणार आहे, हिंदू पध्दतीने हा विवाह होणार असून ह्या लग्नाची थीम होळी ठेवण्यात आली आहे.  हे लग्न ह्या वर्षीच्या लग्नांच्या यादीत एक शाही लग्न ठरणार आहे.सध्या श्रिया आपल्या मित्र-परिवाराला आपल्या लग्नाचे निमंत्रण देण्यामध्ये व्यस्त आहे. बातमी अशी पण होती की काही दिवसांपूर्वी श्रिया रशियाला जाऊन आपल्या बॉयफ्रेंडच्या कुटुंबातील सदस्यांना भेटली. श्रियाच्या लग्नाच्या बातमीने तिच्या चाहत्यांची मनं जरूर दुखावली असतील पण सगळेजण ह्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.‘इशितम’ या तेलगू चित्रपटापासून श्रियाने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. यानंतर २००२ मध्ये ‘संतोषाम’ हा तिचा दुसरा चित्रपट आला. या चित्रपटाने बम्पर कमाई केली होती. २००७ मध्ये  तामिळ चित्रपट ‘शिवाजी’ या तिच्या चित्रपटानेही रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात तिच्या अपोझिट मेगास्टार रजनीकांत दिसले होते. याच वर्षात आलेला तिचा ‘आवारापन’ हा चित्रपटही गाजला होता.