Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चिकनी चमेली'नंतर श्रेया घोषालला 'या' गाजलेल्या गाण्यासाठी झालेली विचारणा, 'ते' शब्द वाचले अन् थेट नकारच दिलेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 14:02 IST

करीना कपूरच्या 'या' गाजलेल्या गाण्याची श्रेयाला मिळालेली ऑफर, थेट नकारच दिलेला कारण...

Shreya Ghoshal: प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल हे संगीतविश्वातील मोठं नाव आहे.आपल्या गोड आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेची जगभरात फॅनफॉलोइंग आहे.संजय लीला भन्साळी यांनी तिला त्यांच्या देवदास या चित्रपटातून तिने  बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. श्रेयाने या चित्रपटात कविता कृष्णमूर्ती यांच्यासोबत 'सिलसिला ये चाहत का', 'बैरी पिया', 'चालाक चालाक', 'मोरे पिया' आणि 'डोला रे डोला' अशी चार गाणी गायली. त्यानंतर तिच्या करिअरला  कलाटणी मिळाली. सध्याच्या घडीला श्रेया घोषाल ही इंडस्ट्रीतील आघाडीची गायिका आहे. अशातच श्रेया तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.

काही दिवसांपूर्वी श्रेया घोषालने तिच्या 'चिकनी चमेली' या गाण्याबद्दल भाष्य केलं होतं. अशा प्रकारची गाणी यापुढे गाणार नसल्याचं वक्तव्य तिने केलं होतं. त्यानंतर आता गायिकेने आणखी एका लोकप्रिय गाण्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. करीना कपूरवर चित्रित केलेल्या 'फेविकॉल से' या गाण्यासाठी देखील तिला विचारणा झाली होती. मात्र, श्रेया घोषालने ते गाण्यास नकार दिला. यावेळी श्रेयाने त्या गाण्याचं नाव घेणं टाळलं.  राज शमानी यांना दिलेल्या मुलाखतीत श्रेयाने त्या गाण्याची ऑफर नाकारण्यामागचं कारण सांगितलं. ती म्हणाली, चिकनी चमेलीनंतरही मला बरीच गाणी ऑफर झाली. मात्र, त्या गाण्यांचे बोल खूपच वेगळे होते. चिकन बनवून वगैरे खा... असे शब्द त्या गाण्यांमध्ये होते. मी ते शब्दसुद्धा उच्चारू शकत नाही. 

मग ती म्हणाली, ते शब्द वाचून माझा चेहरा लाल झाला. त्यामुळे मी ते गाणं नं गाण्याचा निर्णय घेतला. मी त्यांच्यासमोर हात जोडले आणि तिथून निघून आले."असा खुलासा गायिकेनं केला. दरम्यान, 'फेविकॉल से' हे गाणं सलमानच्या दबंग २  चित्रपटातील आहे. करीना कपूरवर चित्रित केलेलं हे गाणं तेव्हा खूप गाजलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shreya Ghoshal rejected 'Fevicol Se' due to its lyrics.

Web Summary : Shreya Ghoshal revealed she refused to sing the popular song 'Fevicol Se' after 'Chikni Chameli' due to its objectionable lyrics. She felt uncomfortable with the suggestive words and declined the offer despite its popularity.
टॅग्स :श्रेया घोषालबॉलिवूडसेलिब्रिटी