Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा म्हणते,‘ पीसी नेहमीच स्वत:ला सिद्ध करते ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 11:57 IST

अभिनेत्री श्रद्धा कपूर ही प्रियंका चोप्राची चाहती आहे. तिला वाटते की, ‘ प्रियंका स्वत:ला तिच्या कामातून सिद्ध करत असते.’ ...

अभिनेत्री श्रद्धा कपूर ही प्रियंका चोप्राची चाहती आहे. तिला वाटते की, ‘ प्रियंका स्वत:ला तिच्या कामातून सिद्ध करत असते.’ श्रद्धाला एका इव्हेंटवेळी विचारण्यात आले की तुझा आदर्श कोण? तेव्हा ती म्हणते,‘ मी फार पूर्वीपासून प्रियंका चोप्राची फॅन आहे. मला वाटतं की, तिने आत्तापर्यंत जे काम केले आहे त्यासाठी तिने स्वत:ला सिद्ध केले आहे.श्रद्धाने प्रियंकाच्या यशाविषयी टिवट केले की,‘ वो...हो...! अनस्टॉपेबल!!!! ’ ‘गेट रेडी टू फाईट’ या गाण्याच्या लाँचिंगवेळी बोलताना श्रद्धा म्हणाली,‘ मी जेव्हा या गाण्याचा व्हिडीओ पाहिला तेव्हा मी सोफ्यावरून खाली पडलेच.मला अजूनही विश्वास बसत नाही की, यात करण्यात आलेले अ‍ॅक्शन सीन्स हे बॉलीवूड चित्रपटासाठी आहेत का? खरंतर हे खुप प्रेरणादायी गाणे असून लोक पाहतील त्यावेळी प्रेरित होतील. मी टायगरला जेव्हा पाहते तेव्हा मला खुप प्रेरणा मिळते.’