Join us

श्रद्धा कपूरने ऐकला वडिलांचा सल्ला; एक्स बॉयफ्रेंडपासून दूर राहणे केले पसंत!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 19:10 IST

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता फरहान अख्तर यांच्यातील नाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर ...

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता फरहान अख्तर यांच्यातील नाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की, श्रद्धा आणि फरहान एकमेकांवर प्रेम करीत असून, ते रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांमधील ही चर्चा एवढ्यावरच थांबली नाही, तर हे दोघे लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे बोलले जात होते. मात्र श्रद्धाचे वडील शक्ती कपूर या नात्याच्या प्रचंड विरोधात असल्याने त्यांनी श्रद्धाला फरहानपासून दूर राहण्यास स्पष्ट शब्दात ताकीद दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तसेच करिअरकडे लक्ष देण्याचा सल्लाही दिला होता. कदाचित वडिलांनी दिलेला सल्ला श्रद्धाला योग्य वाटला असून, तिने हळूहळू फरहानपासून दूर जाण्यास सुरुवात केली आहे. असे म्हटले जात आहे की, श्रद्धा सध्या तिच्या करिअरकडे लक्ष देत असून, तिला फरहानसोबत कुठल्याही प्रकारचे नाते ठेवायचे नाही. याबाबतचा एक पुरावाही समोर आला आहे. त्याचे झाले असे की, श्रद्धा कपूरला फरहान अख्तरसोबत स्टेज शेअर करण्याची आॅफर मिळाली होती. मात्र तिने त्यास नकार दिला. बिहार सरकारने पटना येथे मॅरेथॉनचे आयोजन केले. या मॅरेथॉनसाठी मिल्खा सिंग आणि फरहान अख्तरसह श्रद्धा कपूरलाही आमंत्रित करण्यात आले होते. परंतु श्रद्धाने मॅरेथॉनला उपस्थित राहण्यास नकार दिला. श्रद्धाच्या या नकाराचे कारण फरहान अख्तर असून, त्याच्यासोबत तिला कुठल्याही प्रकारचे स्टेज शेअर करायचे नाही. श्रद्धा लवकरच बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित बायोपिकच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. फरहान आणि श्रद्धाने पहिल्यांदा ‘रॉक आॅन-२’ मध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगपासूनच दोघांमधील अफेअरच्या चर्चा समोर आल्या होत्या. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचेही समोर आले होते. दरम्यान, श्रद्धा सध्या साउथ सुपरस्टार प्रभाससोबत ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘साहो’नंतर ती बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावरील बायोपिकच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.