प्रभासची हिरोईन बनण्यासाठी श्रद्धा कपूरला करावे लागणार ‘हे’ काम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 15:39 IST
बॉलिवूडची ‘हसीना’ अर्थात श्रद्धा कपूर ही सध्या हवेत आहे आणि का नसावे? ‘बाहुबली’ प्रभाससोबत आॅनस्क्रीन रोमान्स करणारी ती पहिली ...
प्रभासची हिरोईन बनण्यासाठी श्रद्धा कपूरला करावे लागणार ‘हे’ काम!
बॉलिवूडची ‘हसीना’ अर्थात श्रद्धा कपूर ही सध्या हवेत आहे आणि का नसावे? ‘बाहुबली’ प्रभाससोबत आॅनस्क्रीन रोमान्स करणारी ती पहिली बॉलिवूड अभिनेत्री जी असणार आहे. होय, ‘बाहुबली2’नंतर प्रभासचा ‘साहो’ हा नवा सिनेमा येतोय आणि या चित्रपटासाठी प्रभासच्या अपोझिट श्रद्धा कपूरला साईन करण्यात आले आहे. काल-परवाच आम्ही ही बातमी कन्फर्म केली होती. आता याच चित्रपटाच्या निमित्ताने आणखी काही अपडेट्स आहेत. ते काय? तर ‘साहो’चे शूटींग सुरु करण्याआधी श्रद्धाला एक मोठे काम करावे लागणार आहे. होय, ‘साहो’चे शूटींग सुरु करण्यापूर्वी श्रद्धाला आपले वजन कमी करावे लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल, श्रद्धाला वजन कमी करण्याची गरज काय? तर आहे.अलीकडेच श्रद्धाने ‘हसीना’ हा चित्रपट पूर्ण केला. यात श्रद्धा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच रिलीज होऊ घातलेल्या या चित्रपटातील हसीनाच्या भूमिकेसाठी श्रद्धाने वजन वाढवलेले होते. ‘साहो’च्या मेकर्सला मात्र श्रद्धा अगदी तिच्या परफेक्ट फिगरमध्ये हवी आहे. त्यामुळेच प्रभाससोबत शॉट देण्याआधी श्रद्धाला जिममध्ये बराच घाम गाळावा लागणार आहे.‘साहो’साठी श्रद्धाने तोंडबोली किंमत मिळवली, असे कळते. आता मागेल तेवढी रक्कम मिळाली असेल, तर ‘इतना तो बनताही है.’ अर्थात भूमिकेची गरज त्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. श्रद्धा स्वत:ही हे जाणून आहे. ‘हसीना’साठी श्रद्धा वजन वाढवू शकते तर ‘साहो’साठी कमीही करू शकतेच. चला तर, या नव्या कामासाठी श्रद्धाला शुभेच्छा देऊ यात आणि ‘साहो’ची प्रतीक्षा करूयात.