Join us
Daily Top 2Weekly Top 5

​श्रद्धा कपूर झालीयं बिझी?? पण कशात??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 19:29 IST

 श्रद्धा कपूर सध्या जाम बिझी आहे. थांबा...थांबा...‘ओके जानू’चे वा अन्य कुठल्याही चित्रपटाचे शूटींग..प्रमोशनमध्ये म्हणत असाल तर असले काहीही नाही. ...

 श्रद्धा कपूर सध्या जाम बिझी आहे. थांबा...थांबा...‘ओके जानू’चे वा अन्य कुठल्याही चित्रपटाचे शूटींग..प्रमोशनमध्ये म्हणत असाल तर असले काहीही नाही. श्रद्धा बिझी आहे, ती त्वचेची काळजी घेण्यात. होय, सध्या श्रद्धा तिची त्वचा पुन्हा टवटवीत व्हावी, यासाठी प्रयत्न करतेय. अनेक तास काम केल्यामुळे श्रद्धाच्या त्वचेचा रंग म्हणे, काहीसा काळवंडला आहे. त्यावरचे तेज हरवून ती निस्तेज दिसू लागली आहे. यामुळे श्रद्धाला जाम टेन्शन आलेय. मग, काय?? त्वचा पुन्हा ताजीतवानी करण्यासाठी श्रद्धा रोजच्या आहारापासून अन्य सगळ्या गोष्टींवर लक्ष देतेय. आहारात स्ट्रॉबेरी,पीच खातेयं. एक अभिनेत्री असल्याने मला अनेक तास काम करावे लागते. यामुळे माझी त्वजा निस्तेज झाली होती. रंग काळवंडला होता. त्यामुळे मी आहारावर लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे माझ्या त्वचेला लाभ होईल, असे श्रद्धा म्हणाली.