Join us  

स्वत:साठी नाही तर श्रद्धा कपूर भावासाठी करतेय जिवाचा आटापिटा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 8:02 PM

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरकडे सध्या बरेच काम आहे. पण श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूर याच्या हाताला मात्र सध्या काम नाहीय.

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरकडे सध्या बरेच काम आहे. पण श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूर याच्या हाताला मात्र सध्या काम नाहीय. ‘हसीना पारकर’ या चित्रपटात सिद्धांत दिसला. (हा चित्रपटही बहिणीच्याच पुण्याईने त्याला मिळाल्याची चर्चा होती.) या चित्रपटात सिद्धांतने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला बॉक्सआॅफिसवर चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. यातील श्रद्धा कपूरआणि सिद्धांत या दोघांच्याही भूमिकेचेही कौतुक झाले होते. त्यामुळे या चित्रपटानंतर सिद्धांत आणखी काही चित्रपटात दिसेल, अशी अपेक्षा होती. पण तसे काहीही घडताना दिसत नाहाये. नाही म्हणायला ‘हसीना पारकर’नंतर जे पी दत्ता यांच्या ‘पलटन’मध्ये सिद्धांत दिसणार आहे. पण यातील त्याची भूमिका अतिशय छोटी असल्याचे कळतेय. त्यामुळे सिद्धांतच्या करिअरच्यादृष्टीने तो फार मोठा चित्रपट म्हणता येणार नाहीये. अशात ‘पलटन’ याव्यतिरिक्त सध्या सिद्धांतकडे कुठलाही चित्रपट नाहीये. याऊलट श्रद्धाकडे मात्र चित्रपटांची रांग लागली आहे. पण कुठल्याही बहिणीसाठी हे पुरेसे नाही. स्वत:प्रमाणेच आपल्या भावालाही यशस्वी होताना पाहणे, कुण्या बहिणीला आवडणार नाही.  कदाचित त्यामुळेच आता श्रद्धानेच कंबर कसली आहे.

 होय, सूत्रांचे मानाल तर, भावाला चित्रपट मिळावे म्हणून श्रद्धा बरेच प्रयत्न करतेय. श्रद्धाच्या म्हणण्यावरून अलीकडे सिद्धांतने काही निर्मात्यांच्या भेटी घेतल्या. अर्थात या भेटींचा फार फायदा झाला नाहीच. त्यामुळे भावाला लवकरात लवकर एखादा चित्रपट मिळवून देण्यासाठी श्रद्धाचा आटापिटा सुरू आहे. श्रद्धाच्या या प्रयत्नांना किती यश येते, ते बघूच.श्रद्धाबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटात दिसणार आहे. यात शाहिद कपूर तिचा हिरो आहे.‘सेक्रेड गेम्स’मधील न्यूड सीन्स व्हायरल, राजश्री देशपांडेला लोक पाठवताहेत अश्लिल संदेश!!

 

टॅग्स :श्रद्धा कपूरबॉलिवूड