Join us

घाम गाळून गाळून थकली श्रद्धा कपूर! सायना नेहवालला दिले सणसणीत उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 21:11 IST

गत वर्षभरापासून श्रद्धा कपूर बॅडमिंटन कोर्टमध्ये घाम गाळतेय. पण आता तिचाही संयम सुटलाय आणि आता तिनेही सायना नेहवालला खरी-खोटी सुनावली.

गत वर्षभरापासून श्रद्धा कपूर बॅडमिंटन कोर्टमध्ये घाम गाळतेय. पण आता तिचाही संयम सुटलाय आणि आता तिनेही सायना नेहवालला खरी-खोटी सुनावली. आता आम्ही कशाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या ध्यानात आलेचं असेल. होय, आम्ही बोलतोय ते भारताची फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्यावर आधारित बायोपिकबद्दल. या चित्रपटात श्रद्धा कपूर दिसणार आहे. पण या बायोपिकमध्ये श्रद्धाने सायनासारखे अगदी प्रोफेशनल प्लेअर दिसावे, असा सायनाचा अट्टाहास आहे. माझी व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्यासाठी श्रद्धाला आणखी मेहनत करावी लागेल, असे सायना अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली. सायनाची ही मुलाखत ऐकली अन् श्रद्धाची तळपायातली मस्तकात गेली आणि शेवटी ती सुद्धा जे बोलायचे ते बोललीच.

 ‘सायनाच्या बायोपिकसाठी मी जीवतोड मेहनत घेतेय. कोर्टवर प्रोफेशनल प्लेअर दिसावी, म्हणून माझेही प्रयत्न सुरू आहेत. पण काही महिन्यांच्या प्रशिक्षणात मी एकदम प्रोफेशनल प्लेअर बनून जाईल, हे शक्य नाही. एक वर्षांत मी खूप घाम गाळला आहे, असे ती म्हणाली.सूत्रांचे मानाल तर श्रद्धाने निर्माता- दिग्दर्शकालाही माझ्या कामाबद्दल समाधानी नसाल तर दुसरी सोय बघा, हे सांगून टाकले आहे. श्रद्धाचा हा पावित्रा बघून निर्माता- दिग्दर्शकचं नाही तर सायनाही नरमली आहे आणि येत्या सप्टेंबरपासून या चित्रपटाचे शूटींग सुरु करण्यास राजी झाले आहेत.2017 हे वर्ष श्रद्धा कपूरसाठी फारसं लकी राहिलं नाही़ या वर्षांत आलेले 'ओके जानू' आणि 'हसीना पारकर' हे तिचे दोनही चित्रपट बॉक्स आॅफिसवर फ्लॉप झाले. लवकरच श्रद्धाचा ‘स्त्रि’ आणि ‘बत्ती गुल मीटर चालूू’ रिलीज होत आहेत. प्रभासच्या अपोझिट ‘साहो’मध्येही ती झळकणार आहे.

टॅग्स :श्रद्धा कपूर