Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा कपूरने साऊथच्या 'या' सुपरस्टारला पाठवले तिळाचे लाडू, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 14:54 IST

श्रद्धा कपूर सध्या छिछोरा आणि साहोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी श्रद्धाला मुंबई ते हैदराबाद ट्रॅव्हल करावं लागतं.  मात्र मकर संक्रातीचा सण साजरा करण्यासाठी सुट्टी घेऊन मुंबईत आली आहे.  

ठळक मुद्देश्रद्धा साहो, छिछोरे, सायना नेहवालचा बायोपिक आणि एबीसीडीमध्ये दिसणार आहेसाहोमधून श्रद्धा साऊथ इंडस्ट्रीत डेब्यू करतेय

श्रद्धा कपूर सध्या छिछोरा आणि साहोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी श्रद्धाला मुंबई ते हैदराबाद ट्रॅव्हल करावं लागतं.  मात्र मकर संक्रातीचा सण साजरा करण्यासाठी सुट्टी घेऊन मुंबईत आली आहे.  

सूत्रांच्या माहितीनुसार, श्रद्धाच्या किचनमध्ये तयार होणारी मिठाई खूप प्रसिद्ध आहे अनेकवेळा ती ही मिठाई अनेकवेळा सेटवर सुद्धा घेऊन येते. तिच्या घरी बनणार तेळाचे लाडू खूप चविष्ट असतात. यावेळी श्रद्धाने तिच्या घरी तयार झालेले लाडू तिचा 'साहो'मधील सहकलाकार प्रभासला पाठवले आहेत. प्रभास सध्या चारमीनार शहरात शूटिंग करतोय त्याठिकाणी श्रद्धाने त्याच्यासाठी लाडू आणि तूपात बनवलेली खिचडी पाठवली आहे.       

श्रद्धाच्या कामाबाबत बोलायचे झाले तर ती साहो, छिछोरे, सायना नेहवालचा बायोपिक आणि एबीसीडीमध्ये दिसणार आहे.  साहोमधून श्रद्धा साऊथ इंडस्ट्रीत डेब्यू करतेय. यात  प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे़ तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुजीत यांनी दिग्दर्शित या सिनेमात श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'छिछोर'मध्ये श्रद्धा सुशांत सिंग राजपूतसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या सिनेमात प्रतीक बब्बरदेखील असून तो निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करत आहे. 'छिछोरे' सिनेमा यावर्षी 30 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :श्रद्धा कपूरप्रभास