Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता ! 'बॉयफ्रेंड' रोहनसोबत मावस भाऊ प्रियांकच्या लग्नाला पोहोचली श्रद्धा कपूर, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 17:36 IST

2018 पासून दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली असे म्हटले जाते.

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर रूम प्रेयसी रोहन श्रेष्ठासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे. मात्र, श्रद्धा कधीही तिच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलली नाही. गुरुवारी, श्रद्धा कपूर रोहनसोबत मावस भाऊ प्रियांकच्या लग्नात हजर होती. हे दोघे वेडिंग पार्टीमधून एकत्र बाहेर पडताना दिसले. यादरम्यान श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरही तिच्यासोबत दिसला.

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी यांच्या मुलगा प्रियांक आणि प्रसिद्ध निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शजासोबत प्रियांकने कोर्ट मॅरेज केले आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्रमैत्रिणींसाठी एका रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. पार्टीत श्रद्धाने व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला होता तर रोहनने ब्लू रंगाचा कुर्ता घातला. सिद्धांत कपूरबाबत बोलायचे झाले तर त्यांना ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लॅक पाजामात दिसला. 

श्रद्धाच्या लग्नाबद्दल वडील शक्ति कपूर म्हणाले होते.. श्रद्धाचे वडील अभिनेते शक्ती कपूर यांनी केवळ ही एक अफवा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले आहे की, अशाप्रकारच्या अफवा कोण पसरवत आहे हेच मला कळत नाहीये. मी नेहमीच माझ्या मुलीच्या प्रत्येक निर्णयात तिच्या पाठिशी उभा असतो. रोहन हा केवळ श्रद्धाचा लहानपणापासूनचा मित्र आहे. तो एक खूप चांगला मित्र आहे. पण त्या दोघांमध्ये याशिवाय कोणतेही नाते नाहीये. माझी मुलगी कोणासोबतही लग्न करेल त्यास माझा नेहमीच पाठिंबा असेल...

 रोहन आणि श्रद्धा एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत असून त्यांनी 2018 पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली असे म्हटले जात आहे.

टॅग्स :श्रद्धा कपूर