Join us

"चंदेरीत पुन्हा ‘स्त्री’ची दहशत..",श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावाने 'स्त्री २'च्या शूटिंगला केली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 17:23 IST

. चित्रपटाचा पहिला भाग रिलीज झाल्यानंतर 5 वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

राजकुमार राव, श्रद्धा कपूर आणि पंकज त्रिपाठी यांच्या 2018 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'स्त्री'च्या सिक्वेलबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. नुकतीच निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा केली. आता स्वत: श्रद्धा कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 

श्रद्धा कपूर आणि राजकुमार यांची धमाकेदार केमिस्ट्री असलेल्या 'स्त्री' या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटाचा पहिला भाग रिलीज झाल्यानंतर 5 वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रद्धा कपूरने राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलचा व्हिडिओही शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या आधी स्वत: राजकुमार रावनेही या चित्रपटाचा व्हिडिओ  शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर 'स्त्री 2' चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. स्त्री 2 चे शूटिंग सुरु झाले आहे. यावेळीही श्रद्धा कपूर 'स्त्री २' चित्रपटात राजकुमार रावसोबत मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच आज म्हणजेच 11 जुलै रोजी त्याने चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे. श्रद्धाने सांगितले की, चित्रपट ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत.

याआधी श्रद्धा कपूर रणबीर कपूरसोबत 'तू झुठी मैं मकर'मध्ये दिसली होती. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. . स्त्रीच्या पहिल्या भागातील संवाद आणि पंकज त्रिपाठी आणि राजकुमार राव यांच्या कॉमिक टायमिंगने चित्रपटाला हिट केलं होतं. चित्रपटाची कथा एका 'चेटकीणी' भोवती फिरते जी वार्षिक गाव उत्सवादरम्यान येते आणि पुरुषांचे अपहरण करते. 

टॅग्स :श्रद्धा कपूरराजकुमार राव