Join us

'गाडी नाही तर हा माझा रथ...' नवी कोरी गाडी घेऊन मंदिरात पोहचली श्रध्दा कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 15:40 IST

आपल्या नव्या कोऱ्या लॅम्बोर्गिनी गाडीची श्रद्धा कपूरने विधिवत पूजा केली. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. एकदा सर्वांचं लक्ष एका खास कारणामुळेश्रद्धा कपूरकडं वळलं आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रद्धा कपूरने स्वतःला एक खास भेट दिली आहे. यंदाच्या दसऱ्याच्या खास मुहूर्तावर तिनं नवीन आलिशान गाडी खरेदी केली आहे. आपल्या नव्या कोऱ्या लॅम्बोर्गिनी गाडीची श्रद्धा कपूरने विधिवत पूजा केली. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये श्रद्धा आपली महागडी लॅम्बोर्गिनी गाडी चालवताना दिसून येते. त्यांतर ती विधीपूर्वक कारची पूजा करताना पाहायला मिळाली. श्रद्धाने यावेळी अगदी साधा लुक केला होता. गुलाबी आणि पांढर्या रंगाचा ड्रेस, कपाळावर टिकली आणि कानात झुमके अशा लुकमध्ये ती दिसली. शिवाय पापराझीशी बोलताना 'ही गाडी नाही तर माझा रथ आहे', असे ती म्हणाली. नव्या गाडीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून आला. 

श्रद्धाची ही लॅम्बोर्गिनी लाल रंगाची आहे. या Huracan Tecnica च्या Lamborgini कारची किंमत तब्बल ४ कोटी रुपये आहे. मुंबईतच पहिल्यांदाच एका महिलेने ही कार खरेदी केली आहे. त्यामुळे सर्वांनाच श्रद्धाचा खूप अभिमान वाटतोय. तसंच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. याआधी श्रद्धाकडे BMW 7 होती ज्याची किंमत 2.46 कोटी इतकी होती. तर त्याहीआधी तिच्याकडे Mercedes Benz GLE ही 1 कोटीची कार होती. 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, श्रद्धा कपूर शेवटची 'तू झुठी मैं मक्कर' मध्ये दिसली होती. मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर दिसला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. आता श्रद्धा कपूरकडे अनेक चित्रपट आहेत. श्रद्धा कपूर आता 'स्त्री 2', 'नागिन' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. श्रद्धा कपूरच्या या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :श्रद्धा कपूरबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी